Aditya Thackeray : लोकशाही उरली आहे का? विचार करण्याची गरज, ED ने राऊतांना दिलेल्या दणक्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
राऊतांवर झालेली कारवाई पक्षपाती असेल तर संजय राऊतांनी कोर्टात (High Court) जावं असा टोला भाजप नेते लगावत आहेत. तर संजय राऊतांवर भाजपवर वारंवार टीका केल्यामुळे सूडबुद्धीतून ही कारवाई झाली आहे, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आज ईडीने (Ed) मोठा दणका दिलाय. संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. त्यावर सर्व बाजुने प्रतिक्रिया उमटत आहेत. राऊतांवर झालेली कारवाई पक्षपाती असेल तर संजय राऊतांनी कोर्टात (High Court) जावं असा टोला भाजप नेते लगावत आहेत. तर संजय राऊतांवर भाजपवर वारंवार टीका केल्यामुळे सूडबुद्धीतून ही कारवाई झाली आहे, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहे. त्यामुळे साध्या यावरून माहोल तापला आहे. अशातच शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. देशात लोकशाही राहिली आहे का? याबाबत आता विचार करण्याची गरज आहे, अशी खोचक प्रतिक्रिया या कारवाईनंतर आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
हे आपल्याला स्प्ष्ट दिसत आहे की या कारवाई राजकीय हेतून सुरू आहेत. यात सूडबुद्धी स्पष्ट दिसत आहे. हे देशात सुरू असलेले लोकशाहीचं वातावरण नाही, हे राजकीय वातावरण नाही, हे दाबावशाहीचं वातावरण आहे, अशी खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. शिवसेना भाजपसोबत गेली नाही, त्यामुळे या कारवाई सुरू आहेत, असा आरोप वारंवार करण्यात येत आहे. मात्र अशा धमक्या यायला लागल्या तर देशात लोकशाही उरली आहे का? याबाबत विचार करण्याची गरज आहे. मतदारांना खुले आम धमक्या येत आहे, त्यामुळे याबाबत गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले आहेत.
राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंचा टोला
या कारवाईविरोधात शिवसेना एकजूट होऊन लढेल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. तसेच देशात लोकशाही आणि न्यायप्रक्रिया उरली आहे का? कारण खुलेआम धमक्या येऊन कारवाई होतं आहे. त्यामुळे आता सर्वांना हा विचार करण्याची गरज आहे. मनसे आणि राज ठाकरेंनी ईडीच्या कारवाईबाबत केलेल्या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आदित्य ठाकरे म्हणाले, संपलेल्या विषयाबाबत जास्त बोलायचं नसतं, असे म्हणत त्यांनी मनसे आणि राज ठाकरे यांनाही जोरदार टोला लगावला आहे. या कारवाईवरून सध्या राज्यात पुन्हा वातावरण तापलं आहे.
Congress: काँग्रेसच्या असंतुष्टांची नाना पटोलेंवरच भडास?; डिनर डिप्लोमसीत ‘खाना’खराबा?