आदित्य ठाकरे लग्नाचा प्रश्न विचारताच असं काय बोलून गेले की सर्वच हसायला लागले?
आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या भविष्याबाबत आपले विचार मांडले. शाश्वत विकासाचा भर देत, त्यांनी कांदळवन, इलेक्ट्रिक वाहने आणि कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा आणि बेस्टच्या आर्थिक स्थिरतेवरही त्यांनी भाष्य केले.
“मी फ्रेंच भाषा शिकावी, असं आपल्या आजोबाचं म्हणणं होतं”, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृह समोर आर्ट सोसायटी येथे दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. ‘मुंबईचा आदित्योदय 2025’ या दिग्दर्शिकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मुलाखतीचा देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या भवितव्याबाबतचं व्हिजन मांडलं. विशेष म्हणजे या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. ठाकरे नेते कीर्तिकुमार शिंदे आणि पत्रकार सौरभ शर्मा यांनी आदित्य ठाकरे यांची मुलाखत घेतली.
प्रश्न – आजची मुंबई प्रदूषणाच्या विळख्यात चालली आहे. प्रदूषणावर उपाय म्हणून कांदळवन पर्याय तुम्ही आणलात तर ते कसं सुचलं?
आदित्य ठाकरे – माझं नाव कुठे आलं तर कार्यक्रम कसा छोटा असेल यावर भर देतो. कॅलेंडरमध्ये जी कामे केलेली आहेत ती दाखवली आहेत. मुंबईत बिल्डिंग झाली विकास होतोय. पण शाश्वत विकास झाला पाहिजे. त्यामुळे कांदळवन बनवायचं ठरवलं. कांदळवन आणण्यासाठी मोठी गोष्ट होती त्यासाठी खूप प्रयत्न झाले.
प्रश्न – तीन-चार वर्षात मुंबईत इलेक्ट्रिक वाहन घेण्यासाठी पुढे लोक येत आहेत. तुमची भूमिका मोठी होती. भविष्याचा विचार केला तर इलेक्ट्रिक वाहणाचे प्रसार वाढणार आहे?
आदित्य ठाकरे – आम्ही EV पॉलिसी आणताना जगात काय सुरु आहे त्याचा विचार करत होतो. आता EV गाड्या जास्त विकत घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रात आकडा वाढत चालला आहे. अनेक स्कुटर वाढत चालल्या आहेत. आपण पुढच्या वर्षात ग्रीन नंबर प्लेट रस्त्यावर पाहणार आहोत.
प्रश्न – कोस्टल रोड हे मोठं नाव आहे. तुम्ही जे स्वप्न पाहिलेलं तसा रोड झालाय का?
आदित्य ठाकरे – 2014 ते 17 आम्हाला कोस्टल रोडच्या परवानगीला लागले. कोस्टला रोडला सरकार आल्यानंतर मिटिंग घ्यायचो. आमचं सरकार राहीलं असतं तर 2023 ला पूर्ण कोस्टल रोड पूर्ण केला असता. अजून अनेक गोष्टी पूर्ण व्हायचा आहेत. कोस्टल रोडला पॅच वर्क आलेले आहेत भ्रष्ट असलं की हे पुढे येतं.
प्रश्न – BMCच्या शाळेकडे आतापर्यंत नाक मुरडणारी जनता BMC च्या शाळेकडे वळत आहेत?
आदित्य ठाकरे – आपल्याकडे 1232 शाळा होत्या. 2010 पासून टॅब वरच्यूल क्लास सुरु केले, तरीही गळती सुरु होती. अनेक गोष्टींवर आपली कामे सुरु होती. या सरकारने टीचर ट्रेनिंग सुरु केल पाहिजे.
प्रश्न – मराठी माध्यमाच्या शाळेबदल काय मत?
आदित्य ठाकरे – जेवढ्या भाषा तुम्हाला येतात तेवढं चांगल आहे. मराठी येणं गरजेचं आहे. जेवढा अभ्यास करता येईल किंवा बोलता येईल तेवढं चांगलं आहे. बेसिक इंग्लिश येणं गरजेचं आहे. माझा आज्या (बाळासाहेब ठाकरे) ते आणि मी एकमेकांना डिक्शनरी भेट द्यायचो. फ्रेंच भाषा मी शिकावं, असं आज्याचं म्हणणं होतं. जेवढ्या भाषा येतील त्याने सोपं होतं.
प्रश्न – बेस्ट वाचवण्यासाठी काय करावं लागेल?
आदित्य ठाकरे – बेस्टला जेवढी संख्या हवीय तेवढी नाहीय. बेस्टला BMC ने फंड दिला पाहिजे. BMC ने MMRDA ला फंड द्यायला पैसे आहेत. पण बेस्टला दिला जात नाही सरकारने बेस्टला फंड देण गरजेचं आहे.
प्रश्न – पेंग्विन आणले त्यावर टीका केली
आदित्य ठाकरे – मी एकच उत्तर देईन. मी पेंग्विन दाखवतो आता तुम्ही चित्ते दाखवा. पण ते जिवंत असतील तर
प्रश्न – मुंबई पुढे तीन आव्हाने कोणती असतील?
आदित्य ठाकरे – मुंबईत घराची परिस्थिती निर्माण होणार आहे. लोक वाढतायत त्यांना आपण एवढी घर देऊ शकू का?
प्रश्न – कॅलेंडरला मुहूर्त आला. लग्नाचा मुहूर्त केव्हा येणार?
उत्तर – हा घरी प्रश्न दाखवू नका. कठीण प्रश्न विचारू नका