मुंबई: गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. कामगारांनी संप मागे घेण्यास नकार दिलेला असतानाच एसटी कामगारांचे वकील अॅड. गुणवंत सदावर्ते यांनी मोठं विधान केलं आहे. जोपर्यंत राज्य सरकारकडून लिखित आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे, असं गुणवंत सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत सदावर्ते यांनी मीडियाशी संवाद साधला. संप मिटवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय घेणार आहोत. पण सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
एसटीच्या संपाबाबत आज 3 वाजेपर्यंत शासन आदेश जारी करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सरकारचे प्रतिनिधी कुठेही असू देत सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे. ही प्रक्रिया 12 आठवड्यात पूर्ण करायची आहे. आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांबाबत जसे काम केले तसेच काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे. संप मिटवायचा की नाही याबाबत संध्याकाळी निर्णय घेण्यात येईल. सरकारचा लिखित आदेश वाचल्याशिवाय संप मिटवणार नाही, असं सदावर्ते यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काल परत बीडमधील एका एसटी कामगार बांधवाने आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून या कर्मचाऱ्याला वाचवले असले तरी त्याची प्रकृती नाजूक आहे. आतापर्यंत 31 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पण हे प्रस्थापितांचं सरकार झोपेचं सोंग घेतंय आणि कोर्टाची दिशाभूल करतंय. जर यांनी वेळेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली असती तर 31 जणांचे प्राण वाचले असते आणि महाराष्ट्रातील जनतेची गैरसोय टळली असती, असं पडळकर म्हणाले.
जराही नैतिकता शिल्लक असेल तर 31 जणांनी केलेल्या आत्महत्येची जबाबदारी स्वीकारून अनिल परब राजीनामा देणार का?, असा सवाल करतानाच आम्ही लोकशाही मार्गाने आंदेलन करणाऱ्या एसटी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी आहोत. आर्यन खानची सुटका व्हावी म्हणून मुख्यमंत्री तात्काळ नवाब मलिक व गृहमंत्र्यांसोबत मिटींग घेतात. पण मराठी एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना चर्चा करायलाही वेळ नाही. आपली जबाबदारी न्यायालयावर ढकलून स्वतः नामानिराळे राहायचे हाच त्यांचा डाव आहे. पण त्या 31 कर्मचाऱ्यांच्या आत्म्याचा तळतळाट तुम्हाला सुखानं जगू देणार नाही, हे लक्षात ठेवा, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 November 2021 https://t.co/fBUtfl6MbK #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 8, 2021
संबंधित बातम्या:
नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी
पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचं मन जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर
(adv gunratan sadavarte on ST bus strike in Maharashtra)