अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेचा मोर्चा डॉमिनोजकडे

डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. | MNS warns Dominos Pizza

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेचा मोर्चा डॉमिनोजकडे
Follow us
| Updated on: Dec 31, 2020 | 12:34 PM

मुंबई: मराठीत व्यवहार करण्याच्या मुद्द्यावरून जगप्रसिद्ध अ‍ॅमेझॉनला (Amazon) धडा शिकवल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आता आपला मोर्चा पिझ्झा (Pizza) आणि तत्सम खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉमिनोजकडे (Dominos) वळवला आहे. डॉमिनोजच्या अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध नाही. तसा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मनसेने केली आहे. (Include Marathi language in Domino’s app Raj Thackeray’s MNS warning)

डॉमिनोजच्या प्रशासनाने मनसेच्या या मागणीची दखलही घेतली आहे. आम्ही लवकरच अ‍ॅप्लिकेशनवर मराठी भाषा उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन डॉमिनोजने मनसेला पत्राद्वारे दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी आंदोलन सुरु केले होते. सुरुवातीला मनसेने पत्रं, इशारे आणि बॅनरबाजीच्या माध्यमातून या मुद्द्याचा पाठपुरावा केला. मात्र, अ‍ॅमेझॉनने याविरोधात न्यायालयात धाव घेत राज ठाकरे यांना नोटीस पाठवल्यानंतर मनसेच प्रचंड आक्रमक झाली होती.

त्यानंतर मनसेने मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये अ‍ॅमेझॉनची कार्यालये आणि गोदामांची तोडफोड करण्याचा सपाटा लावला होता. मनसेच्या या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनने शरणागती पत्कारत सात दिवसांत अ‌ॅमेझॉनच्या संकेतस्थळावर मराठी भाषेचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. हा सर्वप्रकार पाहता डॉमिनोजने अगोदरच मनसेसमोर शरणागती पत्कारल्याचे चित्र दिसत आहे.

डॉमिनोज मराठी अ‍ॅप सुरू करणार

अ‍ॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि डॉमिनोजला पत्र देणारे मनसे उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांना पत्र देऊन आपण मराठीत अ‍ॅप्लिकेशन सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुंबईत अ‍ॅमेझॉनविरूद्ध मनसे वाद पेटला; नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) सुरु केलेल्या मोहिमेने आता आक्रमक स्वरुप धारण केले होते. मनसेकडून (MNS) मुंबईभरात अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले होते.. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला होता.

संबंधित बातम्या:

मनसेच्या इशाऱ्यानंतर जेफ बेझॉस नमले, ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये मराठीच्या समावेशासाठी हालचाली

Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश

(Include Marathi language in Domino’s app Raj Thackeray’s MNS warning)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.