Mumbai Rain : बेसावध क्षणी पावसाने गाठलं, मुंबईत कुठे कोसळला पाऊस?
Raining in Mumbai : हवमान विभागाने मुंबईतही पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आधीच वर्तवला होता. मागच्या तीन-चार दिवसांपासून मुंबईत ढगाळ हवामान आहे.
Mumbai Rain : मुंबईकरांना आज बेसावध क्षणी पावसाने गाठलं. मागच्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळतोय. आज पहाटेच्या सुमारास मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत मागच्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. दोन दिवसांपूर्वी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. पण आज सकाळी 6.30 वाजल्यापासून मुंबईत पावसाने जोर धरलाय.
अचानक आलेल्या या पावसामुळे सकाळच्या शिफ्टसाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे मात्र चांगलेच हाल झाले. पावसाळा नसल्यामुळे छत्र्या, जॅकेट सगळं कपाटात बंद आहे. अशा बेसावध क्षणी पावसाने मुंबईकरांना गाठलं.
मुंबईत कुठे झाला पाऊस?
मुंबईत सर्वप्रथम उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, गोरेगाव, अंधेरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु झाला. ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. त्यानंतर दक्षिण मुंबईत दादर, परेल, भायखळा, सीएसटी या परिसरात पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. मुंबईतच नाही, शेजारच्या ठाण्यातही पावसाच्या सरी बरसल्या. ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळला.
शेतकऱ्यांच मोठं नुकसान
हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच मोठ नुकसान झालं आहे. राज्यात मागच्या तीन-चार दिवसांपासून हा पाऊस सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार, अशी स्थिती आहे, त्यात शेतीचे पंचनामे अजून बाकी आहेत. पावसामुळे पाणी तुंबलय का?
या पावसामुळे कुठेही पाणी तुंबलेलं नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरु आहे. फक्त कामावर निघालेल्या नोकरदारांना आज भिजतच ऑफिस गाठाव लागणार असं चित्र आहे.