Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोव्हेंबरमधील पावसाने मुंबईकरांना वाचवले, प्रदूषणाची पातळी घटली

Mumbai Air Pollution | मुंबईत गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने मुंबईकरांना चांगला दिलासा दिला आहे. मुंबईतील हवेतील प्रदूषण कमी झाले आहे. मुंबईतील प्रदूषण कमी झाले नाहीतर विकास कामे थांबण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. परंतु एका पावसाने सर्वकाही बदलले.

नोव्हेंबरमधील पावसाने मुंबईकरांना वाचवले, प्रदूषणाची पातळी घटली
Mumbai RainImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 12:27 PM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 :  दिवाळीचा उत्सव सुरु झाला असताना मुंबईकरांवर प्रदूषणाचे संकट आले होते. मुंबईत हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाचा एक्यूआय 200 वर गेला होता. मुंबईतील प्रदूषणाची ही सर्वोच्च पातळी होती. चार दिवसांत प्रदूषणाची पातळी सुधारा, अन्यथा विकास कामे बंद करु, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई मनपाला सुनावले होते. त्यानंतर राज्य सरकार सक्रीय झाले. राज्य सरकारने प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने बैठक घेतली. शक्य ते सर्व प्रयत्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. अगदी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु एका पावसाने मुंबईकरांची चिंता मिटवली.

प्रदूषणाची गुणवत्ता सुधारली

मुंबईतील प्रदूषणाची गुणवत्ता सुधारली आहे. मुंबईत गुरुवारी रात्री पाऊस झाला. मुंबईतील अनेक भागांत तासभर झालेल्या या पावसामुळे मुंबईची हवेची गुणवत्ता सुधारली आहे. या पावसामुळे 200 च्या वर गेलेला एक्यूआयची गुणवत्ता सुधारली आहे. आता हा एक्यूआय 94 वर आला आहे. यामुळे मुंबईकरांना श्वास घेणे सोपे झाले आहे. मुंबई हवामान विभागाने यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईचे तापमान शुक्रवारी 24 ते 30 अंश सेल्सियस होते.

कसा हवा एक्यूआय

  • 0 ते 50 चांगला
  • 51 ते 100 समाधानकारक
  • 101 ते 200 मध्यम
  • 201 ते 300 वाईट
  • 301 ते 400 अतिशय वाईट
  • 401 ते 500 धोकादायक

उल्हासनगर धोकादायक पातळीवर

उल्हासनगरने प्रदूषणाच्या बाबतीत मुंबईलादेखील मागे टाकले आहे. मुंबईची हवेचा गुणवत्ता घसरली असताना उल्हासनगर येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा गुरुवारी २०० च्या वर गेला होता. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर ही नोंद करण्यात आली होती. प्रदूषणाच्या बाबतीत उल्हासनगरने मुंबईलादेखील मागे टाकले होते. यामुळे चिंता व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी काय-काय उपाययोजना करता येतील? यासाठी बैठक घेतली. यावेळी रस्त्यावर धूळ, बांधकामांमुळे निर्माण होणारी धूळ आणि माती दिसता कामा नये, असे स्पष्ट आदेश दिले. तसेच हजार टँकरच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रस्ते पाण्याने धुवावे, असे आदेश दिले. परंतु पावसामुळे सध्या त्याची गरज पडली नाही.

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....