Breaking News : राज ठाकरेंच्या इशाऱ्याचे पडसाद, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दुपारी बैठक, काय निर्णय होणार?

सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहील, असं निर्णय गृहखात्यानं घेतलेला आहे.

Breaking News : राज ठाकरेंच्या इशाऱ्याचे पडसाद, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची दुपारी बैठक, काय निर्णय होणार?
उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 10:43 AM

मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) अल्टिमेटमची गंभीर दखल महाविकास आघाडी सरकारकडून घेतली गेली आहे की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. कारण भोंग्याच्या अनुशंगानं महत्त्वपूर्ण घडामोडी राज्यात घडू लागल्या आहेत. पोलीस प्रशासनही सतर्क झालंय. तर इकडे गृहमंत्री उद्धव ठाकरे (Dilip Valse Patil & Uddhav Thackeray Meeting) यांची भेट घेणार आहे. गृहमंत्री दिलीस वळसे पाटील यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होईल. या चर्चेत नेमकं काय ठरतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापलंय. अशातच सर्व जिल्हा प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची (Maharashtra Police Officers) पोलिस महासंचालक लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत भोंगे आणि लाऊडस्पीकर संदर्भातील सर्व मार्गदर्शक सूचनाचे कटाक्षाने पालन करण्याच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

सर्व धर्माच्या लोकांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावायचा झाल्यास स्थानिक प्रशासकीय परवानगी अनिवार्य राहील, असं निर्णय गृहखात्यानं घेतलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा बैठकीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे.

पाहा व्हिडीओ :

पोलिसांकडून खबरदारी

भोंग्यांसंदर्भात गृहविभागानं सर्वात मोठा निर्णय घेतलाय. भोंगे आणि लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी बंधनकारक असणार आहे. भोंग्यांसाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी अनिवाय असेल, असं गृहविभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. फक्त मुस्लिम बांधवांसाठी नव्हे, तर सर्व धर्मियांना भोंगे किंवा लाऊडस्पीकर लावताना परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.

गृहविभागाच्या निर्णयानंतर पोलीस महासंचालकांनी याच संदर्भातल महत्वाची बैठक घेणार आहेत. सर्व जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांबरोबर पोलीस महासंचालकांची बैठक पार पडेल. या बैठकीत या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा होईल, असं बोललं जातंय.

राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर सरकार एक्शन मोडमध्ये

गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजावरुन आक्षेप नोंदवला होता. या भोंग्यांना हनुमान चालिसेनं उत्तर देण्यात येईल, असंही राज ठाकरेंनी म्हटलं होतं. दरम्यान, हे वक्तव्य चर्चेत आल्यानंतर राज ठाकरेंनी ठाण्यातील उत्तर सभेतही महत्त्वपूर्ण इशारा सरकारला दिला होता. तीन मे पर्यंतचा अल्टिमेटम राज ठाकरेंनी म्हटलं होतं. तीन मे पर्यंत परवानगी नसलेले, नियमांचं पालन न करणारे भोंगे जे मशिदींवर लागलेले आहेत, त्यांवर मनसे स्टाईल ऍक्शन घेऊन, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर सगळ्यात आधी नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. नेमकं त्यांनी काय म्हटलंय?

पाहा व्हिडीओ : नाशिक पोलीस आयुक्त EXCLUSIVE

संबंधित बातम्या :

Kirit Somaiya INS Vikrant Case : ईडीपेक्षा आमचे पोलीस अधिक सक्षम, सोमय्यांच्या चार दिवसाच्या चौकशीवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

राज ठाकरेंना इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटेंचं आव्हान, आपल्या वर्गाला बसण्याचाही सल्ला!

James Laine : 20 वर्षानंतर जेम्स लेन बोलायला लागला, बाबासाहेब पुरंदरेंबाबत जेम्स काय म्हणतोय? वाचा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.