अधिकाऱ्यांवर भरवसा नाही, नितीन राऊतांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन; वीज पुरवठ्याची घेतली माहिती

तोक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज बैठक बोलावली होती. (after tauktae cyclone hit maharashtra, nitin raut had review meeting)

अधिकाऱ्यांवर भरवसा नाही, नितीन राऊतांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन; वीज पुरवठ्याची घेतली माहिती
nitin raut
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 8:12 PM

मुंबई: तोक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्याची माहिती घेण्यासाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज बैठक बोलावली होती. मात्र, पालघरमधील वीज पुरवठ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर राऊत काही समाधानी झाले नाहीत. त्यांनी थेट पालघरचे पालकमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना फोन केला आणि पालघरमधील वीज पुरवठ्याच्या कामावर समाधानी आहात का? अशी विचारणा केली. त्यामुळे बैठकीला उपस्थित असलेले अधिकारीही अवाक् झाले. (after tauktae cyclone hit maharashtra, nitin raut had review meeting)

वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आणि मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या मंत्रालयातील दालनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल उपस्थित होते. तसेच महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (ऑपरेशन्स) संजय ताकसांडे आदी अधिकारीही उपस्थित होते.

महावितरणकडे झाडे कापण्याच्या मशीनच नाहीत

पालघरमधील वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या आघाडीवर नेमकी काय प्रगती आहे याबद्दल त्यांनी आजच्या बैठकीत चर्चा केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर केवळ विसंबून न राहता त्यांनी पालघरचे पालकमंत्री दादा भुसे यांना दूरध्वनीवर संपर्क साधला. तसेच ते वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामाबाबत समाधानी आहेत का, याची चौकशी केली. भुसे यांनी दिलेल्या सूचनांवर कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पालघरमध्ये महावितरणकडे झाडे कापण्याच्या मशीन्स नसल्याच्या तक्रारीवरून त्यांनी अधिकाऱ्यांना जाबही विचारला. तसेच तौक्ते वादळ व यापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात महावितरण व महापारेषणच्या सर्व अधिकारी/ कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. त्याबद्दल यापूर्वीच मी सर्वांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत त्यांनी सर्वांचे कौतूक केले.

वादळ येणार हे गृहित धरून नियोजन करा

गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळ आले. यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आले. जागतिक वातावरण बदल आणि इतर भौगोलिक कारणामुळे दरवर्षी असे चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा इशारा येईल आणि मग आपण नियोजन करू यापेक्षा आता दरवर्षी मान्सूनच्या तोंडावर चक्रीवादळ येणार हे गृहीत धरून नियोजन करा. वादळामुळे आपले कमीतकमी नुकसान होईल आणि वीज पुरवठा तात्काळ पूर्ववत करता येईल यासाठी कायमस्वरूपी नियोजन व आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तयार करा, असे निर्देश त्यांनी दिले.

दरवर्षी पाऊस आल्यावर अनेक ठिकाणी वीज जाते. हे टाळण्यासाठी पावसाळी पूर्व तयारीचा भाग म्हणून पाऊस झाल्यावरही वीज पुरवठा कायम रहावे यासाठी आपत्कालीन योजना तयार करा, अशा सूचना त्यांनी केल्या. तसेच एखाद्या ठिकाणी वीज गेल्यास तिथे वीज पुरवठा करण्याचे अन्य पर्याय काय असतील याचाही आराखडा तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले.

आमदार, खासदार, पत्रकारांचे फोन उचला

यावेळी त्यांनी फोन न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. आकडेवारीवरून खंडित झालेला वीज पुरवठा आपण लवकरात लवकर पूर्ववत करतो हे जरी खरे असले तरी बऱ्याच ठिकाणी फिल्डवर्कवर वेगळी परिस्थिती असते. याबाबत आमदार, खासदार व इतर माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार आपल्या फिल्डवरील अधिकाऱ्यांना फोन व दूरध्वनी करीत असतात. परंतु, काही अधिकारी फोनही उचलत नाहीत व दाद देत नाहीत, अशा तक्रारी मला प्राप्त झाल्या आहेत, अशा शब्दांत त्यानी काही अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणाची चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

चक्रीवादळ रोधक यंत्रणेसाठी अभ्यास

यावेळी ऊर्जा सचिव दिनेश वाघमारे यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्यात चक्रीवादळ येऊन वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून चक्रीवादळ रोधक वीज पायाभूत सुविधा कशा उभारता येतील याचा अभ्यास सध्या सुरू आहे. या विषयावर केंद्र सरकारसोबत नियमित चर्चा सुरू असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.तर महाराष्ट्र सरकारने चक्रीवादळानंतर ज्या पद्धतीने वेगाने वीज पुरवठा सुरळीत केला त्याचे कौतूक केंद्रीय ऊर्जा सचिवांनी केले आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी यावेळी दिली. (after tauktae cyclone hit maharashtra, nitin raut had review meeting)

संबंधित बातम्या:

अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपरेशनचा थरार; ‘बार्ज पी- 305’ वरील 89 कर्मचारी अद्यापही गायब

Photo : INS कोची जहाजाला ‘तौक्ते’ने घेरलं, समुद्रात रेस्क्यू ऑपरेशन, 14 मृतदेह सापडले; 184 जणांची सुटका

INS कोची जहाजातून 184 जणांची सुटका, 6 मृतदेह हाती, अरबी समुद्रात रेस्क्यू ऑपररेशन सुरुच

(after tauktae cyclone hit maharashtra, nitin raut had review meeting)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.