बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर या लोकांनी सरकारकडे केली सुरक्षेची मागणी
Lawrence Bishnoi hit list : बाबा सिद्दिकी यांची हत्या केली जाईल अशी कोणतीत माहिती मुंबई पोलिसांकडे नव्हती. बाबा सिद्दिकी यांना हत्येच्या आधी धमकी आल्याचं बोललं जात होतं. आता त्यांच्या हत्येनंतर आणखी काही नावे पुढे आली आहेत जी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्ट मध्ये आहे. ज्यांनी पोलिसांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दिकी यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत चार लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी काही लोकांचा शोध सुरु आहे. पोलिसांच्या १५ टीम वेगवेगळ्या राज्यात जाऊन तपास करत आहेत. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या सलमान खानच्या जवळ असल्यामुळे झाल्याची चर्चा आहे. कारण लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान सोबत राहणाऱ्या लोकांना धमकी दिली आहे. सलमान खानसह आणखी काही लोकं लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टमध्ये आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने एक यादी तयार केली आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोईचे पुढील लक्ष्य कोण आहेत हे सांगण्यात आले आहे.
12 ऑक्टोबरच्या रात्री राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्र सरकारकडे सुरक्षेची मागणी केल्याची माहिती आहे केली आहे. सलमान खान आणि त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण सलमान खान त्यांच्या हिट लिस्टवर आहे.
रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. या यादीत सलमान खानचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतात. सलमान खानवर काळ्या हरणाची शिकार केल्याचा आरोप होता. त्यामुळेच लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारण्याची धकमी दिली आहे. लॉरेन्स बिश्नोईला स्वतःची डी-कंपनी स्थापन करायची आहे. जेणेकरून तो त्याची दहशत निर्माण करु शकेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेट लिस्टमध्ये झीशान सिद्दिकी, मुनावर फारुकी, शगनप्रीत सिंग, कौशल चौधरी आणि अमित डागर यांचा व्यक्तींचा समावेश आहे. आरोपी धर्मराज कश्यप आणि गुरमेल सिंग यांनी पोलिसांना सांगितले की, झिशान सिद्दिकी देखील त्यांचा हिटलिस्टमध्ये आहे. लॉरेन्स कोणत्याही गरीबाला हात लावत नाही, एवढेच नाही तर सलमान खान आणि दाऊद गँगलाही टार्गेट केले जाईल. असंही त्यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी अनेक राज्यांमध्ये पसरली आहे. या टोळीत ७०० हून अधिक शुटर्स असल्याचा देखील दावा केला जात आहे. बाबा सिद्दिकी यांना टार्गेट केले जाईल अशी कोणतीही माहिती पोलिसांना नव्हती.