माहीम किल्ल्या नंतर, BMC वरळी किल्ल्याच्या सुशोभिकरण करणार, 2 कोटींचा प्रकल्प घेतला हाती

मुंबईतील किल्ले आणि इतर हेरिटेज ठिकाणांचे हे सुशोभीकरण करणे ही आदित्य ठाकरे यांची कल्पना आहे, जी 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर जोमात आमलात आणली गेली. मुंबईतील ही हेरिटेज ठिकाणे पुनर्संचयित करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा उद्देश आहे. बीएमसीच्या अर्थसंकल्पात देखील आदित्य ठाकरेंच्या प्रकल्पांवर भर देण्यात आला आणि निधीची तरतूद करण्यात आली.

माहीम किल्ल्या नंतर, BMC वरळी किल्ल्याच्या सुशोभिकरण करणार, 2 कोटींचा प्रकल्प घेतला हाती
Worli Fort
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 10:17 AM

मुंबईः मुंबईतील हेरिटेज ठिकाणांपैकी एक, वरळी किल्ला्याचे लवकरच मोठे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतलं जाणार आहे. हा प्रकल्प बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे आणि या प्रकल्पासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वरळी किल्ल्याचे जीर्णोद्धार आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय शिवसेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी 1 सप्टेंबर 2021 ला झालेल्या बैठकीत घेतला होता. वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ देखील आहे.

वरळी किल्ला जीर्णोद्धार प्रकल्पांतर्गत किल्ल्याच्या बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाईल, ड्रेनेज सिस्टीमसह किल्ल्यातील इतर ठिकाणांचाही जीर्णोद्धार केला जाईल. किल्ल्याच्या सभोवतालच्या 10 मीटर परिसरात लँडस्केपिंग केले जाईल आणि बेसाल्ट वॉकवे तयार केला जाणार आहे. किल्ला पिसरात रोषणाई देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2 कोटी रुपये खर्च येणार असून हे काम वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहे. पालिकेने दिवाळीपासूनच प्रायोगिक तत्त्वावर किल्ल्याकर रोषणाई करण्यास सुरुवात केली होती आणि ते काम तसच पुढे सुरू राहणार आहे, अशी माहिती मिळतेय.

सध्या किल्ल्याच्या आत एक व्यायामशाळा आहे आणि ती स्थलांतरित केली जाण्याची शक्याता आहे. किल्ल्याच्या 10 मीटर परिसरात सार्वजनिक शौचालयासह आठ ते 10 झोपड्या देखील आहेत, ज्यांना पालीकेकडून पर्यायी निवास व्यवस्थान उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मिळतेय.

माहीम किल्ल्याचं देखील सुशोभीकरण

वरळी किल्ला ब्रिटीशांनी 1675 मध्ये वरळी टेकडीवर बांधला होता, ज्यावेळी मुंबईत फक्त सात बेटे होती. या किल्ल्याचा उपयोग शत्रूची जहाजे आणि समुद्री चाच्यांचा शोध घेण्यासाठी केला जात असे. मुंबई महानगरपालिकेनी हेरिटेज ठिकाणांचे जीर्णोद्धार कामांतर्गत, माहीम किल्ल्याचेही जीर्णोद्धार आणि सुशोभीकरणाचे काम हाती घेतले आहे. पालीकेनी वांद्रे किल्ल्याचे पण जीर्णोद्धार केला आहे आणि लोकांना भेट देण्यासाठी त्याचे सुशोभीकरण केले आहे.

मुंबईतील किल्ले आणि इतर हेरिटेज ठिकाणांचे हे सुशोभीकरण करणे ही आदित्य ठाकरे यांची कल्पना आहे, जी 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर जोमात आमलात आणली गेली. मुंबईतील ही हेरिटेज ठिकाणे पुनर्संचयित करून पर्यटकांना आकर्षित करण्याचा उद्देश आहे. बीएमसीच्या अर्थसंकल्पात देखील आदित्य ठाकरेंच्या प्रकल्पांवर भर देण्यात आला आणि निधीची तरतूद करण्यात आली. दादर समुद्रकिनारा, वरळी किल्ल्याचे सुशोभीकरण आणि शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांवर पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद करण्यात आली हेती.

वरळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर, आदित्य यांनी माहीम, दादर समुद्रकिनारी सुशोभीकरण, किल्ले सुशोभीकरण, प्राणिसंग्रहालय विकास आणि इतर पर्यावरण आणि पर्यटन प्रकल्पांसह विविध नागरी कामांवर जोर दिला आहे.

इतर बातम्या

यूरोप, आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक, मोदींनी तातडीची बैठक बोलवली

एक असं बेट तिथे रोज फक्त 420 लोकांनाच मिळते एन्ट्री!

ST Strike | सरकारचा वाढीव पगार रोखण्याचा दम, आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर परतले, इतरांसाठी आजचा मोठा दिवस

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.