Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav: मुंबई-गोवा हायवेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, 25 ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरस्तीचे कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत दिल्या.

Ganeshotsav: मुंबई-गोवा हायवेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, 25 ऑगस्टपूर्वी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण करा, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश
कामे २५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करा-चव्हाणImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 9:13 PM

मुंबई- गणेशोत्सवापूर्वी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मुंबई-गोवा महामार्गाचा (Mumbai Goa Highway)मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेले या महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. अनेक राजकीय नेते हे कोकणातील असूनही अनेक वर्षांपासून हे काम अद्याप रखडलेले आहे. दरवर्षी कोकणात गणेशोत्सवाला (Ganeshotsav) जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. मात्र अद्यापही हा मार्ग पूर्ण न झाल्याने चाकरमानी मुंबईकर नेहमीच याबाबत नाराजी व्यक्त करीत असतात. आता हा रस्ता येत्या वर्षात पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी केली आहे. मात्र यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांना आणि मुंबईतील चाकरमान्यांना या रस्त्यातील खड्ड्यांचा आणि डायव्हर्झनचा त्रास नेहमीप्रमाणेच सहन करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच या रस्त्यावर खड्ड्यांमुळे चिपळूणजवळ एका तरुणाचा मृत्यू झाल्याचीही घटना घडली होती. आता यंदाच्या गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी पुन्हा या रस्त्यावरुन सुरु होणार आहे. अशा स्थितीत कोकणात जाणाऱ्या रस्त्यांबाबात एक महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली. यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan)यांनी कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ही 25ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

यंदा गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना दिलासा?

कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांची दुरस्तीचे कामे 25 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. सध्या या महामार्गावर खड्डे भरण आणि दुरस्तीची कामे कंत्राटदारांकडून सुरू आहेत. ही कामे अधिक जलद गतीने होण्यासाठी आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त कंत्राटदारांकडून करून घ्या, आणि पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजच्या बैठकीत दिल्या. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगावले, नितेश राणे, वैभव नाईक, राजन तेली, योगेश कदम, रविशेट पाटील, शेखर निकम, किरण पावसकर, राजन साळवी, अनिकेत तटकरे, आदिती तटकरे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अधिकारी उपस्थित होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरस्तीसंदर्भात उपस्थित सर्व आमदार आणि खासदार यांनी आपापल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत सूचना केल्या असून या सूचनांचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ आणि जलदगतीने निर्णय घेऊन काम करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

वाहतूक कोंडी टाळण्याचेही प्रयत्न

संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्राफिक वॉर्डन तैनात करून वाहतूक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही वाहतूक विभागाला देण्यात आले आहेत. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ज्या ज्या कंत्राटदारांकडे देण्यात आली आहे, त्यांच्या कामावर नजर ठेवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अभियंता नेमून देऊन या दोघांचीही नावे शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.