…तर असे पर्यटनच बंद करा, हा व्हिडिओ पहिल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल…कारण…

malshej ghat: गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे वाहू लागल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विकएंडला वर्षाविहारासाठी पर्यटक येतात. परंतु पर्यटक कोणतीही काळजी न घेता घाटात वावरत आहे.

...तर असे पर्यटनच बंद करा, हा व्हिडिओ पहिल्यावर तुम्हीसुद्धा म्हणाल...कारण...
malshej ghat
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 12:16 PM

अहमदनगर-कल्याण महामार्गावरील निसर्ग सौदर्यांनी नटलेला माळशेज घाट आहे. दाट धुके, गर्द झाडी, झाडीतून पक्षांची किलबिल आकर्षित करत असते. पावसाळ्यात या घाटातून वाहणारे धबधबे पाहिल्यावर धरतीवरील स्वर्गाची अनुभती होते. यामुळे वर्षाविहारासाठी माळशेज घाट पर्यटकांना आकर्षित करत असते. परंतु या घाटात पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यापेक्षा मद्याचा नशा घेत आहे. पर्यटकांनी नशेत केलेल्या प्रताप पाहिल्यावर अशा लोकांचे पर्यटनच बंद करा, असेच वक्तव्य करावे लागले. या घाटाची सुरक्षा रामभरोसे आहे.

मद्यधुंद पर्यटकांचा कहर

कल्याण- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनासाठी मनाई हुकुम काढले आहे. परंतु त्यानंतरही काही पर्यटक हा आदेश धाब्यावर बसून येत असतात. त्या ठिकाणी धबधबा पाहणे आणि त्यात भिजण्याचा आनंद घेतात. परंतु काही पर्यटकांनी कहरच केला आहे. दारु पिऊन रस्त्यात धिंगाणा केला. मद्याच्या नशेत रस्त्यावर लोळण घेतली. हा रस्ता अत्यंत धोकादायक आहे. त्या ठिकाणी दरड कधी कोसळू शकतात. तसेच घाट असल्याने कधी कोणते वाहन येईल ही दिसत नाही. परंतु काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत वाहतूक कोंडीला आमंत्रण देत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस कर्मचारीच नाही…

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे माळशेज घाटातील धबधबे वाहू लागल्यामुळे आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी विकएंडला वर्षाविहारासाठी पर्यटक येतात. परंतु पर्यटक कोणतीही काळजी न घेता घाटात वावरत आहे. याठिकाणी महामार्गावरील पोलीस कर्मचारी नसल्यामुळे घाटातील सुरक्षा धोक्यात आहे. मद्यधुंद पर्यटकांमुळे घाटात एखादी दुर्घटना घडायची शक्यता नाकारता येत नाही.

माळशेज घाटात ओतूर पोलिसांकडून मढ गावाच्या पुढे नाकाबंदी केली आहे. पोलीस दारु पिऊन जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करतात. परंतु त्यानंतरही घाटात पर्यटकांनी घातलेला व्हिडिओ समोर आला आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.