शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे, अजित पवार यांची 3 तासांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली तेव्हा संबंधित पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते. याशिवाय शरद पवार यांच्या याबाबतच्या घोषणेनंतर अजित पवार यांनी सुरुवातीचे दोन ते तीन तास काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.

शरद पवार यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे, अजित पवार यांची 3 तासांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 8:49 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. शरद पवार यांनी अचानक पक्षाध्यक्ष पदाच्या जबाबदारीपासून निवृत्तीची घोषणा केल्यामुळे कार्यकर्त्यांचं गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. अखेर कार्यकर्त्यांची हाक शरद पवार यांनी मान्य केली आहे. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला. शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतल्याच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

अजित पवार यांनी ट्विटरवर आपली भूमिका मांडली. “राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे”, असं अजित पवार म्हणाले.

“आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

“एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार नाराज नाहीत

दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे. मी दिल्लीला गेल्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली आहे. अजित पवार मुंबहून पुण्याच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी स्वत: याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली.

शरद पवार आणि अजित पवार येत्या 9 तारखेला साताऱ्याला एका जाहीर कार्यक्रमात एकत्र दिसतील. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला अजित पवार आणि शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

मी नॉट रिचेबल नाही. तर रिचेबल आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माझ्याबद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जात आहेत. माझ्या नाराजीच्या बातम्या तथ्यहीन आहेत, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....