जितेंद्र आव्हाडविरोधात अजित पवारांची खेळी, आव्हाड यांच्या कट्टर समर्थकाला मुंब्रा-कळव्यात विधानसभेत विरोधात उतरणार

jitendra awhad and ajit pawar: विधानसभेत मी किंवा आनंद परांजपे उमेदवार असणार आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले आहे. आता त्यांचा पापाचा घडा भरत आला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातून अनेक लोक पार्टी सोडून गेले आहेत. त्यांची आता सर्व पोल खोल करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाडविरोधात अजित पवारांची खेळी, आव्हाड यांच्या कट्टर समर्थकाला मुंब्रा-कळव्यात विधानसभेत विरोधात उतरणार
jitendra awhad and ajit pawar
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 4:13 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शरद पवार गटातील आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अडचणीत आणण्याची तयारी सुरु केली आहे. कधीकाळी जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेल्या नजीब मुल्ला यांना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात उभे करण्याची तयारी सुरु केली आहे. यामुळे मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघात जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला असा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. नजीब मुल्ला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र् सरचिटणीस आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. नजीब मुल्ला अंगरिका मुहूर्तावर जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर रणशिंग फुंकणार आहे. कळवा मुंब्रा हा जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आव्हान मोठ्या मताधिक्याने तीन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे अजित पवार गट कळवा – मुंब्रा विधानसभा क्षेत्रात विविध कामांबाबत ताशेरे ओढणार आहे.

श्रीकांत शिंदे यांचे पाठबळ मिळणार

दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांचा देखील हा लोकसभा मतदार संघ आहे. यामुळे महायुतीकडून नजीब मुल्ला यांना विधानसभा निवडणुकीत पाठबळ मिळणार आहे. एकेकाळी जितेंद्र आव्हाड यांच्या जवळचे मानले जाणारे नजीब मुल्ला राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांचे कट्टर समर्थक झाले आहेत. त्यांनी ठाण्यानंतर कळवा- मुंब्रा विधानसभा क्षेत्रात जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे.

हे सुद्धा वाचा

नजीब मुल्ला म्हणतात…

मतांचे राजकारण करता आले नाही. विकास कामासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत, असा टोला नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंगळवारी लगावला. नागरिकांच्या समस्या त्या संदर्भातील आमची पोचपावती कामाची असणार आहे. मुंब्राच्या विकासासाठी आम्ही देखील सोबत होतो. मात्र आमच्या लक्षात आले आहे. त्यांचे बोलणे जास्त काम कमी, अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी महायुतीकडून जो पक्ष उमेदवार देईल त्यांना निवडून आणणार असल्याचे नजीब मुल्ला यांनी म्हटले.

मी किंवा आनंद परांजपे

विधानसभेत मी किंवा आनंद परांजपे उमेदवार असणार आहे, असे नजीब मुल्ला यांनी सांगितले आहे. आता त्यांचा पापाचा घडा भरत आला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षातून अनेक लोक पार्टी सोडून गेले आहेत. त्यांची आता सर्व पोल खोल करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.