राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, सुप्रिया सुळे की अजित पवार? राजकीय विश्लेषकांचं नेमकं मत काय?

शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केली आणि त्याबरोबरच नवी चर्चा सुरु झाली की, राष्ट्रवादीचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण? नव्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी एका समितीची सुचनाही शरद पवारांनी केलीय. त्यामुळं अजित दादा, सुप्रिया ताई की तिसराच कोणी कमान सांभाळणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण, सुप्रिया सुळे की अजित पवार? राजकीय विश्लेषकांचं नेमकं मत काय?
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:53 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आणि आता नवा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल? यावरुन चर्चा सुरु झाली. अर्थात राष्ट्रवादीचा अध्यक्ष पवार कुटुंबातलाच असेल की कुटुंबाबाहेरचा हेही पाहणं महत्वाचं असेल. कुटुंबाचा विचार केला तर सुप्रिया सुळे शरद पवारांच्याच कन्या आहेत आणि अजित पवार, शरद पवारांचे पुतणे आहेत. या दोघांपैकी एकाला कमान मिळेल की मग तिसराच चेहरा निवडण्यात येईल याचा निर्णय एक समिती घेणार आहे.

शरद पवारांनी अध्यक्षपदावरुन निवृत्ती जाहीर करताना असतानाच नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी समिती असावी असं सूचवतानाच, समितीत कोण असतील, ती नावंही सूचवलीत ज्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी.चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.

अध्यक्ष कोण होणार, राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

राजकीय विश्लेषकांना अध्यक्ष पवारांच्याच घरातला म्हणजे सुप्रिया सुळे होतील आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून अजित पवारांनाच पसंती मिळेल असं वाटतंय. इकडे शरद पवारांनी अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा करताच अंजली दमानियांनी आपल्या ट्विटनं आणखी ट्विस्ट आणला.

हे सुद्धा वाचा

अंजली दमानिया जे बोलल्यात ते काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही म्हणालेत. राष्ट्रवादी किती दिवस सोबत राहिल माहिती नाही, त्यांची भाजप सोबत बोलणी सुरु आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला. तर पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा राष्ट्रवादीचा अंतर्गत निर्णय असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर, नेते आणि कार्यकर्ते ऐकण्यास तयार नाहीत. 2-3 दिवसांत शरद पवार निर्णयाचा पुनर्विचार करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. पुनर्विचार त्यामुळं शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहतात की, नवा अध्यक्ष राष्ट्रवादीला मिळणार हे 3 दिवसांत स्पष्ट होईल.

शरद पवार राजीनाम्याची घोषणा करताना नेमकं काय म्हणाले?

“प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्यानंतर आणखी मोह ठेवण्यासंबंधीची भूमिका मी काही घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला कदाचित अस्वस्थ वाटेल. मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय आज घेतलेला आहे”, अशी घोषणा शरद पवार यांनी केली.

sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड
sleep apnea साठी कराडला ICU मध्ये ठेवायची काय गरज - जितेंद्र आव्हाड.
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा
अक्षय प्रकरणात मला धस यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही- जितेंद्र आव्हा.
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला
शिंदे आभार कोणाचे मानणार ? EVM चे का ? संजय राऊत यांचा टोला.
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर
जरांगेंनी फडणवीस यांना बोल लावले, पण भाजपाला..., काय म्हणाले आंबेडकर.
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस
'वाल्मीक कराडची जप्त संपत्ती फार लांब...,' काय म्हणाले सुरेश धस.
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.