Maharashtra Election Results 2024: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? लोकसभेनंतर विधानसभेत जनतेच्या कौलात ‘दादागिरी’

Maharashtra Election Results 2024: विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष केवळ १३ जागांवर विजय मिळवत असल्याचे कलामधून दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर विजय मिळवत असल्याचे दिसत आहे. यामुळे खरी राष्ट्रवादी म्हणून जनतेने अजित पवार यांना मान्यता दिली आहे.

Maharashtra Election Results 2024: राष्ट्रवादी शरद पवारांची की अजित पवारांची? लोकसभेनंतर विधानसभेत जनतेच्या कौलात 'दादागिरी'
अजित पवार शरद पवार
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 11:08 AM

देशाच्या राजकारणात काही नेत्यांनी शून्यातून पक्ष निर्माण केला. त्यात एन. टी. रामाराव, बाळासाहेब ठाकरे, मुलायमसिंह यादव, करुणानिधी, एच. डी. देवेगौडा, प्रकाश सिंग बादल, शरद पवार यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांमधील साम्य म्हणजे त्यांनी निर्माण केलेल्या पक्षांवर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांच्याच कुटुंबियांमध्ये कुटुंबकलह आणि संघर्ष झाला. जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाले. त्यानंतर वर्षभरात जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात निर्माण झालेल्या मतभेदानंतर राष्ट्रवादीत फूट पडली. अजित पवार महायुतीसोबत गेले. त्यानंतर शिवसेनेप्रमाणे खरी राष्ट्रवादी कोणाची यासाठी लढाई सुरु झाली. त्या लढाईत निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने दिला. परंतु लोकसभा निकालाचा निर्णय शरद पवार यांच्या बाजूने लागला होता. आता विधानसभेचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागला.

राज्यातील वर्तमान राजकारणात पवार आणि ठाकरे कुटुंब यांचे वर्चस्व सर्वाधिक राहिले आहे. त्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे वलय राज्यातील राजकारणात होते. तसेच वलय शरद पवार यांचे आहे. पक्ष फुटल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत वयाच्या ८३ व्या वर्षी शरद पवार यांनी महाराष्ट्र पालथा घातला. त्यावेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. परंतु विधानसभा निवडणुकीपर्यंत हे यश त्यांना टिकवता आले नाही.

विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांचा पक्ष केवळ १३ जागांवर विजय मिळवत असल्याचे कलामधून दिसत आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ३५ जागांवर विजय मिळवत असल्याचे दिसत आहे. यामुळे खरी राष्ट्रवादी म्हणून जनतेने अजित पवार यांना मान्यता दिली आहे.

बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या विरोधात शरद पवार यांनी अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली होती. परंतु बारामतीकरांची पसंती अजित पवार यांना राहिली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष
शरद पवार गटाच्या बैठकीत विधानसभेच्या निकालावर नाराजी, EVM विरोधात रोष.
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया
'मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव...', संजय शिरसाटांची मोठी प्रतिक्रिया.
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी
नवा CM कोण? उत्सुकता शिगेला, 'रामगिरी'वर पुन्हा शिंदेंच्या नावाची पाटी.
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्...
शिंदेंची नाराजी दूर व्हावी म्हणून भाजपची खेळी, आठवलेंचं वक्तव्य अन्....
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला...
नव्या सरकारचा शपथविधी कधी? नवा CM कोण? भाजपचा बडा नेता म्हणाला....