पुण्याच्या ‘त्या’ रॅपरच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता, आता अजित पवार यांचं शिंदे-फडणवीस यांना पत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अश्लील शब्दांचा वापर करुन रॅप साँगचं शूटिंग करणाऱ्या एका रॅपरच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण या प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे.

पुण्याच्या 'त्या' रॅपरच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता, आता अजित पवार यांचं शिंदे-फडणवीस यांना पत्र
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 6:23 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा पत्र पाठवलं आहे. याआधी अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात त्यांनी खारघरला झालेल्या श्रीसेवकांच्या मृत्यू प्रकरणावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. त्यानंतर आज अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात एका रॅप साँग प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

“सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आणि विद्यापीठ वास्तुला फार मोठा इतिहास आहे. अशा या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत, अधिसभा भरते त्या ठिकाणी, अश्लील भाषेतील रॅप साँगचे शूटिंग केले गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कुलगुरुंच्या खुचीवर बसून समोरच्या टेबलवर दारुची बाटली आणि शस्त्र ठेऊन रॅपरने रॅप साँग चित्रीत केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय”, असं अजित पवारांनी पत्रात म्हटलं आहे.

“हा सर्व प्रकार अत्यंत निंदनीय असून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावलौकिकाला काळीमा फासणारा आहे. या संदर्भात चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची तसेच विद्यापीठाने एक चौकशी समिती नियुक्त केल्याची माहिती मिळाली आहे. पण या घटनेची शासन स्तरावर सुद्धा दखल घेण्याची आवश्यकता आहे”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

“या धक्कादायक प्रकारामुळे राज्यातील जनतेत प्रचंड संतापाची भावना आहे. पोलीस तपास आणि चौकशी समितीचा अहवाल तातडीने प्राप्त करुन घेऊन संबंधित दोषींविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनस्तरावरुन सुद्धा आदेश देण्यात यावेत. तसेच, भविष्यात असा प्रकार कोणत्याही विद्यापीठात किंवा शिक्षण संकुलात होणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना शासनामार्फत निर्गमित करण्यात याव्यात, अशी मागणी मी पत्राद्वारे करीत आहे”, असं अजित पवार पत्रात म्हणाले आहेत.

रॅपरने मागितली माफी

दरम्यान, संबंधित रॅपरने कालच या प्रकरणावर खुलासा करत माफी मागितली आहे. या रॅपरचं नाव शुभम जाधव असं आहे. या रॅपरने काल प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. “मी रीतसर परवानगी मागितली होती. तरीही माझ्यावर कारवाई करण्यात येत असून मी माफी मागतो. तक्रार मागे घ्या”, अशी विनंती शुभमने केली आहे.

“माझ्याकडे कागदोपत्री परवानगी नव्हती. पण मी शूट करायला गेलो तेव्हा माझ्याकडे रितसर परवानगी होती. मी विद्यापीठाकडून फोनवरुन परवानगी मिळवली होती. माझ्या गाण्यात शिवीगाळ असेल याची कल्पना दिली नव्हती. विद्यापीठाने आरोप केलाय की, आमच्या परवानगीशिवाय चित्रीकरण केलं. तर ते आरोप खोटे आहेत. या आरोपांना आधार नाही. हे आरोप मी फेटाळून लावतो”, अशी प्रतिक्रिया शुभम जाधव या तरुणाने दिली आहे.

“माझ्याविरोधात गुन्हा दाखल झालाय. चतुर्शिंगी पोलीस ठाण्याचे पीआय यांच्यासी मी बोललोय. त्यांनी सांगितल्यानुसार आणि गुन्ह्याप्रमाणे ते गाणं युट्यूबवरुन काढलं आहे. ते गाणं आता दिसत नाही. मी विद्यापीठाशी बोलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेन. पण वाद मिटत नसेल तर ते गाणं डिलीट करण्यात काहीच अर्थ नाही. गाणं डिलीट करुन, मला आर्थिक नुकसान होत असेल, तसेच माझं नाव बदनाम होऊन वाद मिटत नसेल तर ते गाणं मी परत टाकेन. मग त्या प्रकरणाला वेगळंच वळण येईल”, असा इशारा शुभम जाधवने दिलाय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.