DCM Ajit Pawar: सहाव्यांदा उपमुख्यमंत्री…अजित पवार यांनी वेगळ्यापद्धतीने घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ…

Maharashtra DCM Swearing-in Ceremony: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी 'गांभीपूर्वक प्रतिज्ञा करतो की...' या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला.

DCM Ajit Pawar: सहाव्यांदा उपमुख्यमंत्री...अजित पवार यांनी वेगळ्यापद्धतीने घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ...
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 6:06 PM

Maharashtra DCM Swearing-in Ceremony: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. त्याचवेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेण्याचा विक्रम केला. त्यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पिंक जॅकेट घातला होता. तसेच मी शपथ घेतो ऐवजी त्यांनी ‘गांभीपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शब्दाचा वापर करत वेगळपणा सिद्ध केला.

अजित पवार यांनी केली प्रतिज्ञा

अजित पवार यांनी शपथविधीला सुरुवात करताना म्हटले, ‘मीअजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की…’ या शपथविधी समारंभाला त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रचार दरम्यान वापरलेला गुलाबी जॅकट परिधान केला होता. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार असलेले 22 राज्यांचे मुख्यमंत्री आले होते. उद्योगपती आणि बॉलीवूड स्टार सोहळ्यासाठी आले होते.  सचिन तेंडुलकर  आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकर शपथविधी सोहळ्यास उपस्थित होते.  शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि 40 हजार नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथ घेतली.

मंत्रिमंडळ विस्ताराकडे लक्ष

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर आता पाच डिसेंबर रोजी राज्यात सरकार अस्तित्वात आले. गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. गुरुवारी या तिघांशिवाय कोणीची शपथ घेतली नाही. आता मंत्रिमंडळाचा विस्तार ११ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणा कोणाला स्थान मिळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

आझाद मैदानावर झालेल्या या सोहळ्यास राज्यभरातून महायुतीचे कार्यकर्ते आले होते. सोहळ्यास झालेल्या प्रचंड गर्दीमुळे संयोजकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमानंतर प्रवेश बंद करावा लागला.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.