राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्ष, अजित पवार नाराज झाले का? माध्यमांशी न बोलताच निघून गेले…

मागील महिन्यात मुंबईत आता दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महत्वाची घडामोडी घडल्या आहेत. यानंतर पुन्हा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर अजित पवार यांनी फक्त नूतन पदाधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचे ट्विट केले आहे.

राष्ट्रवादीत दोन कार्यकारी अध्यक्ष, अजित पवार नाराज झाले का? माध्यमांशी न बोलताच निघून गेले...
शरद पवार यांच्या घोषणेच्या वेळी अजित पवार यांची भावमुद्रा
Follow us
| Updated on: Jun 10, 2023 | 3:00 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण? या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले. पक्षाअध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा शरद पवार यांनी मुंबईतून केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसदार कोण? याचा निर्णय दिल्लीतून दिला. शरद पवार यांनी दिल्लीतून भाकरी फिरवली अन् राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यांकडे दिली. यामुळे अजित पवार नाराज झाले का? ही चर्चा सुरु झाली आहे. अजित पवार यांनीही माध्यमांकडे कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षाची मोठी घोषणा आज शरद पवार यांनी दिल्लीतून केली. प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. तसेच खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. परंतु अजित पवार यांच्यांवर सध्यातरी कोणतीही जबाबदारी दिली नाही. शरद पवार यांच्या घोषणेनंतर माध्यमांनी अजित पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अजित पवार यांनी माध्यमांशी कुठलाही संवाद न साधता तेथून निघून गेले. तसेच शरद पवार यांच्या घोषणेनंतर पक्षाच्या झालेल्या बैठकीत ते नव्हते.  यामुळे ते नाराज आहे का? यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांनी केले ट्विट

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फेरबदलानंतर ट्विट केले आहे. त्यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

त्यावेळी अजित पवार यांनी केले समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मागील महिन्यात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पक्षाचे सर्वच नेते राजीनामा मागे घ्या म्हणून शरद पवार यांना आग्रह करत होते. यावेळी जयंत पाटील यांना तर अश्रूच अनावर झाले होते. परंतु अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन करत चार खडे बोल कार्यकर्त्यांना सुनावले. सगळ्यांचा भावना साहेबांनी ऐकल्या. पवार साहेब अध्यक्ष नाही म्हणजे पक्षात नाही, असा गैरसमज तुम्ही करुन घेत आहेत. परंतु आज काँग्रेसचे अध्यक्ष आहे मल्लिकार्जुन खरगे, पक्ष चालला आहे सोनियाजींच्या नावावर. पवार साहेबांचा वयाचा विचार करता नव्या नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली जाणार आहे. हे नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल, असे अजित पवार म्हणाले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.