मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले आहे. ते आता शिवसेना आणि भाजपचा युतीत सामील होणार आहेत. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्यांसोबत नऊ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. राजभवनावर शपथविधीची जोरदार तयारी केली जात आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् भाजपचे नेते एकत्र दिसत आहे. राज्यात आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहे.
राजभवनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल अन् भाजप नेते आशिष शेलार दाखल झाले आहे. राजभवनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते दाखल झाले आहे. त्यात छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश आहे. या शपथविधी समारंभाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वो शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु शरद पवार यांचे निकवर्तीय अजित पवार यांच्या गटात दाखल झाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी सकाळी बैठक झाली. या बैठकीत पक्षाचे अनेक आमदार सहभागी झाले होते. अजित पवार यांच्या निवासस्थानी तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी आली. त्याबातमी पाठोपाठ अजित पवार यांचे स्वीय सहायक राजभवनात दाखल झाले आहे. राजभवनात शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपचे नेते एकत्र राजभवनावर दिसून येत आहे.
रविवारी संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी नऊ मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. त्यात छगन भुजबळ यांचा समावेश आहे. छगन भुजबळ, धनजंय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हे नेते मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ३० आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु शरद पवार यांनी ते बंड मोडून काढले होते.