Special Report : द्रोह असेल तर माझ्याविरोधात केस दाखल करा, अजित पवार यांचं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
याचा अर्थ अजूनही मुजोरी सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांची मुजोरी दबावामध्ये मान्य करत आहेत, असं बावनकुळे म्हणाले.
मुंबई : मी धर्मवीर न म्हणून खूप मोठी चूक केलेली नाही, असं अजित पवार यांचं म्हणणय. दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलं. त्यानंतर पुण्यात अजितदादांचं पुण्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात उडी घेतली. छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक म्हणायला कुणाची ना नाहीच. ते स्वराज्य रक्षक आहेतच. पण, ते धर्मवीर नाहीत, असं म्हणणं संभाजी महाराज यांच्या विचारांशी द्रोह आहे.
देव, देश आणि धर्माकरिता संभाजी महाराज लढले. ते जर नसते तर या महाराष्ट्रामध्ये हिंदूचं उरले नसते. त्यामुळं ते धर्मवीर आहेतच, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं. त्यांना धर्मवीर नाही, असं म्हणण हा द्रोह आहे.
कारण नसताना राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करतात, असा आरोप अजित पवार यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्या हातात सत्ता आहे. तुम्हाला द्रोह वाटतो तर त्यात केसेस दाखल करा. असं आव्हानचं अजित पवार यांनी दिलं.
संभाजी महाराज हे धर्मवीर नाहीत. ते स्वराज्यरक्षक आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपनं अजित पवार यांच्या विरोधात आंदोलनं केली. तरीही अजित पवार आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले.
यात चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उडी घेतली. संभाजीराजे धर्मवीर नाहीत. असं अजित पवार यांचं म्हणण आहे. त्यावर ते ठाम आहेत. याचा अर्थ अजूनही मुजोरी सुरू आहे. त्यांचे कार्यकर्ते त्यांची मुजोरी दबावामध्ये मान्य करत आहेत, असं बावनकुळे म्हणाले.