Ajit Pawar Maharashtra Deputy CM LIVE : राज्य सरकारमध्ये येण्याचा निर्णय का घेतला?, अजित पवार यांनी सांगितलं

Ajit Pawar Maharashtra Deputy CM LIVE : विकासाला महत्त्व दिले गेले पाहिजे, असं आमचं मत आहे. देशाच्या विकासात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात विकास होत आहे. त्यांचा कारभार देशात मजबुतीनं सुरू आहे.

Ajit Pawar Maharashtra Deputy CM LIVE : राज्य सरकारमध्ये येण्याचा निर्णय का घेतला?, अजित पवार यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 4:14 PM

मुंबई : दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज त्यांनी शिंदे-भाजपसोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत ९ राष्ट्रवादीच्या आमदारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ९ जणांना मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, अनेक दिवस चर्चा सुरू होती. वरिष्ठ पातळीवर सर्वजण एकत्र बसायचो. देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहत आहेत.

विकासाला महत्त्व दिले गेले पाहिजे, असं आमचं मत आहे. देशाच्या विकासात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात विकास होत आहे. त्यांचा कारभार देशात मजबुतीनं सुरू आहे. मोदी साहेबांचे चांगले प्रयत्न सुरू आहेत. आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे, यावर विचार सुरू होता. त्यावर आता सिक्कामोर्तब झाले आहे.

म्हणून सत्तेत येण्याचा निर्णय घेतला

देशात विरोधक बैठक घेतात. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. कुठं केजरीवाल विरुद्ध काँग्रेस आहेत, तर कुठं वेगळी परिस्थिती आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीतून काही आऊटपूट निघत नाही. मजबूत नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सत्तेत येण्याचा हा निर्णय घेतला. शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारचं काम सुरू होते.

तरुणांना संधी देणार

मी शुक्रवारी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला. वर्धापनदिनाच्या समोर माझी भूमिका मांडली. एनसीपीची स्थापना झाली तेव्हापासून प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम सुरू होतं. आता तरुणांना संधी देणं गरजेचे आहे. तसा प्रयत्न आमचा आहे. आम्ही सगळ्यांनी विकास हा एकमेव उद्देश ठेवून काम केलं. काही जण आता वेगवेगळी टीकाटीपण्णी करणार. त्याला खूप उत्तर देण्याची गरज नाही.

केंद्राचा निधी राज्याला मिळवून देणार

राज्याचा सर्वांगीण विकास करणे. केंद्राचा निधी राज्याला कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्यातील सगळ्या घटकांना समाधानी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा निर्णय बहुतेक सर्व आमदार, पदाधिकारी यांना मान्य आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न करणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही सामील झालो. कुठल्याही निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या नावाखाली आम्ही निवडणुका लढणार आहोत. पक्ष अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करणार आहोता. त्यासाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले
सरन्यायाधीशांच्या घरी बाप्पाचं दर्शन अन् झालेल्या वादावर मोदी म्हणाले.
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले
राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर दादांची तक्रार, भुजबळ स्पष्ट म्हणाले.
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'
बदलापूर प्रकरणावरून राऊतांचा हल्लाबोल, 'त्यांना शिंदेंचे संरक्षण...'.
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा
जालना-बीड मार्गावर लालपरी अन् ट्रकची धडक, अपघातात वाहनांचा चेंदामेंदा.
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.