मुंबई: राज्याचे मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्त झालेले माजी सनदी अधिकारी अजोय मेहता यांनी आता नवा जुगाड सुरू केला आहे. अजोय मेहता यांनी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशनचे (एमईआरसी) किंवा महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथोरिटीचे (महारेरा) अध्यक्षपद मिळावे म्हणून मेहता यांनी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. मेहता हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती होण्याची दाट शक्यता असल्याचंही राजकीय सूत्रांनी सांगितलं. (Ajoy Mehta trying to MERC and Maharera president post)
दैनिक ‘नवभारत’नं दिलेल्या वृत्तानुसार, अजोय मेहता यांनी एमईआरसी आणि महारेराच्या अध्यक्षपदांसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे त्यांची या दोन्ही पदांपैकी एका पदावर नियुक्ती होतेय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीवर
मेहता यांची या दोन्हीपैकी एका पदावर नियुक्ती करायची की नाही? हे सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. मुख्यमंत्र्यांना मेहता यांची यापैकी एका पदावर नियुक्ती करायची असल्यास तशी शिफारस ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना करतील. त्यानंतरच मेहता यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
या कारणामुळे नियुक्ती नाकारली जाऊ शकते
राज्यात कोरोनाचं संकट सुरू असतानाच मुख्यसचिव म्हणून मेहता यांचा कार्यकाल संपला होता. या काळात त्यांनी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेऊन कोरोना नियंत्रण आणण्यावर भर दिला होता. त्यांच्याच नेतृत्वात राज्यात आरोग्य यंत्रणांचं जाळं निर्माण करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र, मुदतवाढीनंतर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचं संकट रोखण्यासाठी मेहता यांचा उपयोग व्हावा म्हणून त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती. आता ब्रिटनसह काही देशांमध्ये कोरोनाचं नवं संकट उभं राहिलं आहे. या पार्श्वभूमीवर मेहता यांना महारेरा किंवा एमईआरसीवर पाठवल्यास नव्या कोरोना संकटाला रोखण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळणार नाही. त्यामुळेच हे नवं कोरोना संकट पळवून लावण्यासाठी मेहतांसारख्या अधिकाऱ्यांची गरज असल्याने त्यांना इतर ठिकाणी मुख्यमंत्री पाठवतील की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
हे अधिकारी स्पर्धेत
एमईआरसीच्या अध्यक्षपदासाठी मेहता यांच्या शिवाय मुकेश खुल्लर, एमपीएससीचे अध्यक्ष सतीश गवई, कविता गुप्ता, सुधीर श्रीवास्तव आणि राज्याचे विद्यमान मुख्यसचिव संजयकुमार स्पर्धेत आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी या पदासाठी अर्ज केला आहे. संजयकुमार हे फेब्रुवारी 2021मध्ये निवृत्त होत आहेत.
काँग्रेस राष्ट्रवादीचा विरोध
सूत्रांच्या माहितीनुसार मेहता यांना एमईआरसीचे अध्यक्षपद देण्यास दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनाही या पदावर मेहता नको आहेत. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मेहता यांना महारेराचे अध्यक्ष बनविण्यास विरोध केला आहे. मुख्यसचिव असताना मेहता यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्या नाराजीतून दोन्ही काँग्रेसचे नेते मेहता यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Ajoy Mehta trying to MERC and Maharera president post)
हे अधिकारी निवृत्त होणार
सध्या आनंद कुलकर्णी हे एमईआरसीचे अध्यक्ष आहेत. ते 1982च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते 4 जानेवारी 2021 रोजी आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहेत. तर गौतम चटर्जी हे महारेराचे अध्यक्ष असून ते ही 1982च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांचा कार्यकाळ 18 जानेवारी रोजी संपत आहेत. (Ajoy Mehta trying to MERC and Maharera president post)
VIDEO : 36 जिल्हे 72 बातम्या | 23 December 2020https://t.co/ORXvssHEym
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 23, 2020
संबंधित बातम्या:
सरपंच आरक्षण सोडतीला विरोध, हायकोर्टात याचिका, इच्छुकांची धाकधूक वाढली
राज्यपाल नियुक्त सदस्य नेमणुकीची कायद्यात अस्पष्टता, केंद्राला नोटीस; भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
(Ajoy Mehta trying to MERC and Maharera president post)