Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SC final decision On MLA Mahesh Shinde : आक्रमक आमदार महेश शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार, आज होणार फैसला

Supreme Court final decision on MLA Mahesh Shinde disqualification case : स्थानिक उमेदवार हवा म्हणून मतदारांनी कोरेगाव विधनसभेत आमदार महेश शिंदे यांना निवडून दिले. आता त्यांच्या आमदारकीविषयी महानिकाल थोड्याच वेळाच दाखल होईल.

SC final decision On MLA Mahesh Shinde : आक्रमक आमदार महेश शिंदे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार, आज होणार फैसला
Follow us
| Updated on: May 11, 2023 | 1:51 PM

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना धक्का देत महेश शिंदे (MLA Mahesh Shinde )यांनी जोरदार धडक दिली. कोरेगाव मतदार संघात त्यांनी इतिहास नोंदवला. आक्रमक आमदार अशी त्यांची ओळख आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीत आ. शिंदे हे गुवाहाटीत पोहचले आणि इकडे त्यांच्या समर्थकांनी मतदारसंघात जोरदार घोषणा बाजी तर केलीच पण शक्तीप्रदर्शन पण केले. आता काही तासांत 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयी निकाल येणार आहे. या महानिकालात कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे भवितव्य पण ठरणार आहे. राष्ट्रवादीला येथील पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे येथील निकाल अनुकूल लागल्यास सर्वात जास्त आनंद राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना होईल, यात काही शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.

स्थानिक उमेदवार महेश शिंदे यांच्या मागे यावेळी बहुमत होते. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि यापूर्वीचे आमदार शशिकांत शिंदे यांना तगडी फाईट दिली. स्थानिक उमेदवार हवा, असा प्रचार त्यांनी केला. त्यामुळे 2019 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. शशिकांत शिंदे यांचा 6,232 मतांनी पराभव केला. भाजपकडून शिंदे असा त्यांचा राजकीय प्रवास झाला.

आता पण नाराज खरंतर शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीत महेश शिंदे पण होते. तत्कालीन शिवसेना नेतृत्वावर नाराजी जाहीर करत त्यांनी बंडखोरी केली. पण मुळातच आक्रमक असल्याने, शिंदे गटात ही त्यांची घुसमट होत असल्याचे दिसून आले. शंभुराजे देसाई हे आपल्याला समर्थन करत नसल्याने ते नाराज असल्याचे बोलल्या जात आहे.पालकमंत्री ताकद पणाला लावत नसल्याने धुसफूस सुरु आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल त्यांच्यासाठी खास महत्वाचा असेल. आज होणार हा फैसला अनेकांचे भाग्य बदलणार आहे.

हे सुद्धा वाचा

या 16 आमदारांच्या पात्रतेवर होणार निर्णय राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. या निकालात 16 आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोहळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.

आमदार महेश शिंदे 

मतदारसंघ – कोरेगाव (सातारा) आमदारकी – पहिली टर्म (2019) 2019ला कुणाला पराभूत केलं ? – राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे किती मतांनी विजयी – 6,232 मतं राजकीय प्रवास – भाजप ते शिवसेना

LIVE Updates Supreme Court Decision on 16 MLA Disqualification Case Maharashtra | Shiv Sena | Eknath Shinde

आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार
आरोपी दत्ता गाडेला थोड्याच वेळात शिवाजीनगर कोर्टात हजर करणार.
'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का...', ठाकरेंचा शिंदेंना पलटवार
'कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का...', ठाकरेंचा शिंदेंना पलटवार.
मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' मेसेज कुठून आला?
मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा 'तो' मेसेज कुठून आला?.
महिलांनो घाबरू नका...स्वारगेट प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर
महिलांनो घाबरू नका...स्वारगेट प्रकरणानंतर राज्य महिला आयोग ॲक्शन मोडवर.
हिरकणी कक्षात मद्यपींच्या पार्ट्या, पालिकेच्या शाळेत चाललंय काय?
हिरकणी कक्षात मद्यपींच्या पार्ट्या, पालिकेच्या शाळेत चाललंय काय?.
परळीट 109 अज्ञात मृतदेह सापडले; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा
परळीट 109 अज्ञात मृतदेह सापडले; बजरंग सोनवणेंचा खळबळजनक दावा.
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज
'मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी', भाजप नेत्याचं चॅलेंज.
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप.
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका.
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video.