अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नवी मुंबईतील सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर
हवामान खात्याने ९ जुलै मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईत देखील अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी घरीच राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
9 जुलै रोजी अतिवृष्टी होणार असल्याने या इशाऱ्यास अनुसरून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांना मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नवीमुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत.
Maharashtra: Navi Mumbai Municipal Corporation has declared a holiday in all schools in its limits on 9th July. All govt and private schools to remain closed as per NMMC Education dept orders.
— ANI (@ANI) July 8, 2024
हवामान खात्याच्या रेड अलर्टमुळे खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. लोकांना गरज असेल तरच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे. आज मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रुळावर पाणी साचले होते. त्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आता ९ जुलै रोजी देखील अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नवी मुंबईत आज दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. मुसळधार पावसाचा रेल्वेला ही फटका बसला आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द
11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11009 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12123 छत्रपती शिवाजी महाराज – पुणे डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
12109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11008 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12128 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
11010 पुणे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४.
12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन जेसीओ ८.७.२०२४.
12110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पंचवटी एक्स्प्रेस जेसीओ ८.७.२०२४ हि ट्रेन इगतपुरी येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली. (इगतपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अंशत: रद्द)