VIDEO: मोलनूपिरावीरबाबत फक्त चर्चा, आयएसीएमआरकडून कोणत्याही सूचना नाही; अमित देशमुख यांनी घेतला कोरोना स्थितीचा आढावा
मोलनूपिरावीर या नव्या औषधाबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या औषधाबाबत आयएसीएमआरकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
मुंबई: मोलनूपिरावीर या नव्या औषधाबाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या औषधाबाबत आयएसीएमआरकडून कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
अमित देशमुख यांनी आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नव्या मार्गदर्शक सूचनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर अमित देशमुख यांनी मीडियाशी संवाद साधून ही माहिती दिली. काही नवीन मोनलूपिरावीरची चर्चा होत आहे. पण आयसीएमआरकडून स्पष्टता आली नाही. औषध वेळेत मिळावं यासाठी पूर्वतयारी करण्यात आली आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.
तेच उपचार करणार
रुग्ण वाढ झपाट्याने होत आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. दुसऱ्या लाटेत जे उपचार देत होतो तसेच उपचार तिसऱ्या लाटेत देण्यावर निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व पूर्व तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयांच्या हेल्थ वर्करच्या चाचण्या विहीत कालावधीत नियमित करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
राज्यात बेड्सची स्थिती काय?
सध्या 827 बेड पुरुषासाठी आहेत. त्यातील 95 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त आहेत. तर 1500 पेडियाट्रीक बेड्स आहेत त्यापैकी 650 आयसीयू बेड आहेत. 8 हजार 227 बेडपैकी 2 हजार 125 आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनेशन प्लांट बसवले आहेत. तिथे ऑक्सिजनचा साठा 75 टक्के राखण्याचं उद्दिष्ट्ये ठेवलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रोज दीड लाख चाचण्या करण्याची क्षमता
राज्यात एकूण 250 आरटीपीसीरा लॅब आहेत. त्यात शासकीय लॅब 80 आणि 175 खासगी आहेत. त्यामुळे राज्यात रोज 1 लाख 30 हजार चाचण्या करण्याची क्षमता राज्याची आहे. सध्या पॉझिटिव्हीटी रेट 11.46 टक्के आहे. राज्याचा आठवड्याचा सरासरी रेट 8.72 टक्के आहे, असं सांगतानाच राज्याला 16 लाख आरटीपीसीआर किट्स घ्यावे लागमार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
भीतीची लाटही नको, का? राज्यातली ही तुलनात्मक आकडेवारी नेमकं काय सांगते?
दिवसाला 25 हजार रुग्ण आले तर काय करणार?, बेडपासून औषधांपर्यंतचा मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान तयार