अमित शहा देव नसतीलही, पण… : सामना
मुंबई : “अमित शहा हे काही ‘भगवान’ नाहीत. त्यांच्याविरुद्ध निदर्शने झाली तर काय बिघडले? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शहा देव नसतीलही, पण ममताही देवी दुर्गा किंवा ‘संतीण’ नाहीत.” असे म्हणत शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 14 मे रोजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो […]
मुंबई : “अमित शहा हे काही ‘भगवान’ नाहीत. त्यांच्याविरुद्ध निदर्शने झाली तर काय बिघडले? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शहा देव नसतीलही, पण ममताही देवी दुर्गा किंवा ‘संतीण’ नाहीत.” असे म्हणत शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. 14 मे रोजी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान कोलकात्यात भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्यो मोठा वाद झाला आणि त्याचे रुपांतर हिंसाचारात झाले. थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याचीही तोडफोड करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.
“अमित शहा हे काही ‘भगवान’ नाहीत. त्यांच्याविरुद्ध निदर्शने झाली तर काय बिघडले? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांनी विचारला. अमित शहा देव नसतीलही, पण ममताही देवी दुर्गा किंवा ‘संतीण’ नाहीत.” असे म्हणत ‘सामना’त पुढे म्हटलंय की, “प. बंगालात आधी मार्क्सवाद्यांनी हिंसाचार पेरला, त्यात त्यांचाच बळी गेला. आता ममता बॅनर्जी नेमके तेच करीत आहेत. त्यात राज्याची होरपळ होत आहे. देशाला ते घातक आहे.”
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपच्या बड्या नेत्यांना पश्चिम बंगालात प्रचारासाठी पाय ठेवू द्यायचा नाही, ही कसली अरेरावी? असा सवाल ‘सामना’तून विचारण्यात आला आहे. तसेच, “लोकशाहीत हे स्वातंत्र्य सगळ्यांनाच दिले आहे. पुन्हा पश्चिम बंगाल हा हिंदुस्थानचाच भाग आहे व तेथे जाण्या-येण्यासाठी ‘व्हिसा’ची गरज लागत नाही.” असेही ‘सामाना’तून ममता बॅनर्जी यांना सुनावण्यात आले आहे.
“ममता या भडक डोक्याच्या आहेत, पण राज्यकर्त्याने डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून काम करायचे असते. पश्चिम बंगालातील हिंसाचाराने राज्यप्रमुख म्हणून ममता यांचे नाव खराब झाले.” असेही ‘सामना’मध्ये म्हटले आहे.