12.50 कोटींची जंगम मालमत्ता, 4 कोटींचं कर्ज, अमित ठाकरे यांची संपत्ती नेमकी किती?

माहिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अमित ठाकरे यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यांच्यावर एकूण १३.८३ कोटी रुपयांची मालमत्ता आणि ४.१९ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्यावर १.७२ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात ठेवी, शेअर्स आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आहे. अमित आणि मिताली दोघांचा व्यवसाय ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह आहे.

12.50 कोटींची जंगम मालमत्ता, 4 कोटींचं कर्ज, अमित ठाकरे यांची संपत्ती नेमकी किती?
राज ठाकरेंचा पुत्र अमित ठाकरे यांच्या संपत्तीची माहिती उघड
Follow us
| Updated on: Oct 28, 2024 | 9:08 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनी आज माहिम विधानसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना प्रतिज्ञापत्रकाद्वारे आपल्या नावावर असलेल्या संपत्तीविषयी देखील माहिती दिली आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर १२ कोटी ५४ लाख रुपयांची एकूण जंगम मालमत्ता आहे. तर १ कोटी २९ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. अमित ठाकरे यांच्यावर ४ कोटी १९ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला १ लाख ८ हजार रुपये रोख रक्कम आहे. तर बँक खात्यात ४० लाख ९९ हजार ७६३ रुपये इतकी रक्कम आहे.

अमित ठाकरे यांच्या ६ कोटी २९ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर शेअर्स ३ कोटी ९८ लाख रुपयांचे आहेत. तसेच त्यांची पोस्ट खात्यात 20 लाख रुपयांची गुंतवणूक आहे. अमित ठाकरे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तसेच त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे 3 तोळे सोने आहेत. तसेच अमित ठाकरे यांनी आपला ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह असा व्यवसाय असल्याचं म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे किती कोटींची संपत्ती?

अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरे यांच्या नावे १ कोटी ७२ लाख रुपयांची संपत्ती आहे. तर ५८ लाख ३८ हजार ५८७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मिताली ठाकरे यांच्या नावावर ५ कोटी ९३ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. तर त्यांनी म्युचूअल फंडमध्ये ५२ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. मिताली ठाकरे यांच्याकडे ९ तोळे सोने आहे. त्यांच्या मुलाच्या नावावर ७० हजार रुपये आहेत. तसेच मुलाच्या नावाच्या म्युच्यूअल फंडमध्ये ६० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. मिताली यांची तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी आहे. सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स आहेत. तसेच त्यांचादेखील व्यवसाय हा ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्हचा आहे.

अमित राज ठाकरे यांची मालमत्ता किती? थोडक्यात समजून घेऊयात

  • एकूण जंगम मालमत्ता – १२ कोटी ५४ लाख
  • एकूण स्थावर मालमत्ता- १ कोटी २९ लाख
  • एकूण कर्ज – ४ कोटी १९ लाख
  • रोख रक्कम – १ लाख ८ हजार
  • बँकेत असलेली रक्कम – ४० लाख ९९ हजार ७६३
  • ठेवी – ६ कोटी २९ लाख
  • शेअर्स -३ कोटी ९८ लाख
  • पोस्ट खाते – २० लाख
  • एकही गाडी नावावर नाही
  • गुन्हा एकही दाखल नाही
  • सोने- ३ तोळे
  • व्यवसाय – ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह

मिताली ठाकरे यांच्या नावे किती संपत्ती?

  • पत्नी मिताली ठाकरेच्या नावे – १ कोटी ७२ लाख
  • एकूण जंगम मालमत्ता – ५८ लाख ३८ हजार ५८७
  • ठेवी- ५ कोटी ९३ लाख
  • म्युचूअल फंड -५२ लाख
  • सोने -९ तोळे
  • मुलाच्या नावावर ७० हजार
  • मुलाच्या नावे म्युच्यूअल फंड – ६० लाख
  • तथास्तु बिल्डर्समध्ये २० टक्के भागिदारी
  • सह्याद्री फिल्ममध्ये ५० टक्के शेअर्स
  • व्यवसाय-ऑपरेशन अँड टेक्निकल एक्झ्युक्यूटीव्ह
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.