अमिताभ बच्चन यांच्याकडून शीव रुग्णालयाला 1.75 कोटींची वैद्यकीय यंत्रणा, आत्तापर्यंत अनेक रुग्णांवर प्रभावी उपचार
शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास - 1’ प्रकारातील 2 अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत.
मुंबई : शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास – 1’ प्रकारातील 2 अत्याधुनिक अतिदक्षता व्हेंटिलेटर देणगी स्वरुपात नुकतेच दिले आहेत. त्याचबरोबर मॉनिटर्स, सीआर्म ईमेज इन्टेन्सीफायर, इन्फ्युजन पंप इत्यादी सुमारे रुपये पावणे दोन कोटी किमतीची यंत्र सामुग्री देणगी स्वरुपात त्यांनी रुग्णालयाला दिली (Amitabh Bachchan donate crores of medical equipment to hospital in Mumbai).
मदतीनंतर आतापर्यंत 30 गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार
या अनुषंगाने रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांच्या व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने बच्चन यांचे आभार मानले आहेत. सदर दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे शीव रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागात काही दिवसांपूर्वी कार्यान्वित करण्यात आले आहेत. या दोन्ही अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’द्वारे गेल्या काही दिवसात सुमारे 30 गरजू रुग्णांवर प्रभावी उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती शीव रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.
देणगीत मिळालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत
बच्चन यांच्याद्वारे देणगी स्वरुपात प्राप्त झालेले दोन्ही ‘व्हेंटिलेटर’ हे संगणकीय प्रणाली आधारित अत्याधुनिक व अद्ययावत ‘व्हेंटिलेटर’ आहेत. या यंत्रांद्वारे ज्या रुग्णांची प्राणवायू (ऑक्सिजन) पातळी खालावलेली आहे, अथवा ज्यांना श्वास घेण्यास अडचणी येत आहेत, अशा रुग्णांना ऑक्सिजन देण्यासाठी या ‘व्हेंटिलेटर’चा उपयोग केला जात आहे.
‘व्हेंटिलेटर’मध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा
या अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’चे वैशिष्ट्ये म्हणजे याद्वारे गरजू रुग्णांना १०० टक्क्यांपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) देण्याची सुविधा यामध्ये आहे. त्याचबरोबर प्राणवायू दाब आवश्यकतेनुसार कमी-जास्त करण्याची सुविधा सदर ‘व्हेंटिलेटर’मध्ये असून नळीद्वारे थेट फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन देण्याची सुविधा देखील यात आहे. तसेच ‘नॉन इन्व्हेझिव्ह मास्क’ पद्धतीने ऑक्सिजन देण्याची सुविधा या ‘व्हेंटिलेटर’मध्ये आहे, अशीही माहिती डॉ. जोशी यांनी या निमित्ताने दिली आहे.
हेही वाचा :
कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षण मोफत होणार, सरकार लवकरच निर्णय घेणार; वर्षा गायकवाड यांची माहिती
कोरोनामुक्त गावात दहावी- बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
Mumbai Corona | 5 नवे कोव्हिड सेंटर, 70 टक्के ऑक्सिजनयुक्त बेड, तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज
व्हिडीओ पाहा :
Amitabh Bachchan donate crores of medical equipment to hospital in Mumbai