इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; मिटकरींचा आरोप

शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (amol mitkari slams bjp over dhananjay munde issue)

इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी; मिटकरींचा आरोप
अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 7:20 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. इंधन दरवाढीच्या मुद्द्याला बगल देण्यासाठीच भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. (amol mitkari slams bjp over dhananjay munde issue)

अमोल मिटकरी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही टीका केली आहे. भाजप आता सुडाचे राजकारण करत आहेत. मूळ विषयाला बगल देण्याचे काम भाजप करत आहे. भाजपने कालपर्यंत संजय राठोड प्रकरण उचलून धरलं. आज धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. केवळ पेट्रोल- डिझेलसह इतर मुद्द्याला बदल देण्यासाठी भाजप काहीही आरोप करत आहे, असा दावा मिटकरी यांनी केला आहे.

जनतेने कोरोनाची लस घ्यावी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनाची लस घेतली आहे. महाराष्ट्रातील जनतेनेही कोरोनाची लस घ्यावी. आपलं राज्य कोरोनामुक्त व्हावं यासाठी जनतेनेही पुढाकार घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असंही त्या म्हणाल्या.

सरकार टिकविण्याचा आटापिटा नको

सरकार टिकवण्यासाठी किंवा एखादी आघाडी टिकवण्यासाठी काही लोकांना पाठिशी घालणं योग्य नाही. त्यामुळेच पूजा चव्हाण प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी. कोणत्याही दबावाखाली हा तपास होऊ नये. सध्या या प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे तो समाधानकारक नाही. त्यामुळेच देशालाही आदर्श घालून दिला जाईल असा या प्रकरणाचा तपास करण्यात आला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

कोणते ट्रेंड सेट करत आहोत?

आम्ही मागच्या पिढीचे आदर्श घेऊन घडत गेलो. पण आज वेगळेच ट्रेंड सेट होत आहेत. आमच्या पिढीकडून पुढच्या पिढीने काय घेतलं पाहिजे? आम्ही काय ट्रेंड सेट करत आहोत? या सर्व गोष्टींचा चौफेर विचार करायला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. (amol mitkari slams bjp over dhananjay munde issue)

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार

वनमंत्री पदासाठी आता काँग्रेसचं लॉबिंग, मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी!

(amol mitkari slams bjp over dhananjay munde issue)

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.