फडणवीस आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं.

फडणवीस आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात, ही दुटप्पी भूमिका; अमोल मिटकरी यांचे टीकास्त्र
अमोल मिटकरी राज ठाकरे यांच्यावर टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 04, 2022 | 4:09 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी भाजपवर (bjp)  जोरदार हल्ला चढवला आहे. ओबीसी आरक्षणाबद्दल सरकार सकारात्मक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) हे ओबीसींचे घटक आहेत. त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी ओबीसींना आरक्षण द्यावं. एकीकडे फडणवीस ओबीसी आरक्षणावर बोलतात, राज्यपाल महात्मा फुलेंवर टीका करतात ही दुटप्पी भूमिका, अशी घणाघाती टीका अमोल मिटकरी यांनी केली. तसेच ओबीसींच्या आरक्षणावरून राजकारण करायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा सुप्त अजेंडा आहे, असा आरोपही त्यांनी केला. भाजपला कालपासून कामकाज हाणून पाडायचं होतं. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. काही काम नसल्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. ते मीडियाशी बोलत होते.

आमदार अमोल मिटकरी यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला घेतलं. नितीन गडकरी यांनी दाऊदची तुलना स्वामी विवेकानंदांशी केली होती. ती चालते. पण नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध नसताना गोंधळ घातला जातोय, अशी टीका मिटकरी यांनी केली. भाजपने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. त्यावर नरहरी झिरवळ यांनी सही केली. त्यामुळे आता सरकारने मलिकांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजपवर विश्वास ठेऊ शकत नाही. नरहरी झिरवळ हे अत्यंत साधे आहेत. त्यांच्या साधेपणाचा फायदा या कलम कसायांनी घेतला. कलम दिली आणि चुकीने ते झालं, माझ्या हातीही कलम दिली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपने दलाल सोडले

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करता येणार नसल्याचा अहवाल आला आहे. त्याबाबत विचारले असता, भाजपने एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही दलाल सोडले आहेत. त्यांनीच हे सगळं पसरवलंय, असा दावा त्यांनी केला.

राज्यपालांना जाब विचारला जाईल

सोलापूरात जाऊ नये अशी विनंती राज्यपालांना सोलापूरच्या पालकमंत्र्यांनी केली होती. पण विंचवाच्या बिऱ्हाडात हात घालण्याची राज्यपालांना सवय आहे. ते सोलापुरात आले. त्यामुळे शिवप्रेमींनी राडा केला. राज्यपालांना प्रत्येक ठिकाणी जाब विचारला जाईल, सोलापूरसह अख्खा महाराष्ट्र पेटेल, असा इशाराच त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

पाकिस्तानमधील मशीदीत मोठा स्फोट, 30 पेक्षा जास्त मृत्यू, स्फोटामागे हात कुणाचा?

Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवर 25 मार्चपर्यंत कठोर कारवाई नको, हायकोर्टाकडून फोन टॅपिंग प्रकरणी दिलासा

Maharashtra News Live Update : राज्यपालांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ पोहोचलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.