मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवरुन एकच खळबळ उडाली असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन ठाकरे सरकारवर नाव न घेता निशाणा साधला आहे. मात्र, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये पोलीस सहायक सचिन वाझे, आणि टार्गेट 100 असा उल्लेख केला आहे (Amruta Fadnavis tweet on Parambir Singh allegations).
अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?
अमृता फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दोन ओळींची शाहिरी शेअर केलीय. या ओळींद्वारे ठाकरे सरकारवर खोचक शब्दात टोला लगावण्यात आला आहे. “बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी, बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी?”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं (Amruta Fadnavis tweet on Parambir Singh allegations)
बात निकली है तो बहुत दूर तलक जाएगी,
बादशाह को बचाने में कितनो की जान जाएगी ?#SachinWaze #SachinVaze #Target100Cr— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) March 20, 2021
बादशाह कोण?
अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘बादशाह’ असा उल्लेख केलाय. म्हणजे बादशाह हा मुख्य आरोपी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी उल्लेख केलेला बादशाह नेमका कोण? त्यांनी नेमकं कोणावर निशाणा साधलाय हे स्पष्टपणे जाणवत नाही. मात्र, त्यांच्या ‘बादशाह को बचाने के लिए कितनो की जान जाएगी?’ असं म्हटलंय. तरीही उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणी आधी सचिन वाझे आणि नंतर आता अनिल देशमुख यांचे नाव चर्चेत आल्याने ते एकंदरीतच ठाकरे सरकारवर निशाणा साधताना जाणवत आहे. मात्र, त्यांच्या शाहिरीतील बादशाह नेमका कोण? हा प्रश्न तरीही तसाच राहतो.
परमबीर सिंग यांचे नेमके आरोप काय?
अनिल देशमुख यांनी पोलीस सहायक सचिन वाझे यांना दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केलाय. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे गृहमंत्र्यांची तक्रार केलीय. या तक्रारीनंतर एकच खळबळ उडाली आहे.
संबंधित बातमी : चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले