घाईगडबडीत रिक्षातून उतरले, 5 लाखाचे हिरे रिक्षातच विसरले! कशी शोधली पोलिसांनी बॅग?

Mira Road Rikshaw : आता काय करावं, अशा विचारात असतातना राहुल यांनी पोलिस स्टेशन गाठलं. आपली बॅग रिक्षात राहिल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. बॅगमध्ये हिऱ्यांसोबत महत्त्वाची कागदपत्रही होती.

घाईगडबडीत रिक्षातून उतरले, 5 लाखाचे हिरे रिक्षातच विसरले! कशी शोधली पोलिसांनी बॅग?
विसरलेली बॅग पुन्हा सुपूर्द करताना पोलीस
Follow us
| Updated on: Feb 06, 2022 | 8:12 PM

मीरा रोड : मुंबईत रिक्षावाल्यांचा (Auto Rikshaw in Mumbai) प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील. प्रवासी चुकून कधी एखादी गोष्ट विसरला, तर रिक्षा चालक त्याला ती आठवणीनं दिल्याच्या अनेक घटना मुंबईत रिक्षाने प्रवास करणाऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या असतील. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका रिक्षात प्रवासी (Rikshaw passenger) चक्क पाच लाख रुपयांचे हिरे घाईगडबडीत रिक्षातून उतरताना विसरला. रिक्षातून उतरल्यानंतर बॅग रिक्षातच राहिल्याचं त्याला लक्षात आलं. प्रचंड कासावीस झालेल्या या प्रवाशानं आता करायचं काय, असा प्रश्न पडला. अखेर शेवटचा पर्याय म्हणून या प्रवाशानं पोलिस स्टेशन (Police Station) गाठलं आणि मदत घेण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासून घेतलं. त्यामुळे या प्रवाशाच्या जीवात जीव आलाय.

नेमकं कुठे घडला प्रकार? झालं काय?

34 वर्षांचे राहुल लुनावत हे पत्नी आणि लहान मुलीसोबत गुरुवारी कांदिवली ते भाईंदर असा प्रवास रिक्षातून करत होते. रिक्षाच्या मागील बाजूला त्यांनी एक बॅग ठेवली होती. भाईंदरमध्ये उतरताना त्यांची घाईगडबड झाली. या घाईगडबडीत रिक्षात मागे ठेवलेली बॅग ते तिथंच विसरले. यानंतर रिक्षा निघून गेल्यावर रिक्षातील बॅगमध्ये पाच लाखाचे हिरे ठेवले असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

कशी मिळली बॅग परत?

आता काय करावं, अशा विचारात असतातना राहुल यांनी पोलिस स्टेशन गाठलं. आपली बॅग रिक्षात राहिल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं. बॅगमध्ये हिऱ्यांसोबत महत्त्वाची कागदपत्रही होती. ही बाब लक्षात येताच पोलिस निरीक्षक मुगूट पाटील यांनी आपल्या टीमला कामाला लावलं. उपनिरीक्षक किरीण कदम, गजानन चव्हाण, नितीन बोरसे यांच्या पथकाला शोध मोहिमेवर पाठवलं. पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली.

पाच ते सहा ठिकाणचं फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना अखेर नेमकी रिक्षा सापडली. यानंतर वाहतूक पोलिसांच्या मदतीनं पोलिसांनी रिक्षा मालकाचा पत्ता मिळवला. मग कांदिवलीतील ठाकूर विलेज भागात जाऊन शोध घेत पहिल्या मालकाकडून दुसऱ्या मालकाची माहिती मिळाली. अशाप्रकारे पोलिसांना अखेर तो रिक्षावाला सापडलाच. मग पोलिसांनी रिक्षात विसरलेली बॅग आपल्या ताब्यात घेऊन ती नंतर राहुल यांना सुपूर्द केली.

रिक्षाचालकाचा माहीतच नव्हतं!

दरम्यान, मीरा रोडला प्रवाशांना सोडून परतल्यानंतर रिक्षा चालकानं बॅग कुणीतरी विसरलं आहे, याची पुसटीशी कल्पना नव्हती. पण पोलिसांनी विचारल्यानंतर अखेर रिक्षाच्या मागे एक बॅग आढळली. यानंतर ती बॅग सुरक्षित राहिल्याचं रिक्षावाल्यालाही आश्चर्य वाटलंय. मात्र ही बॅग सुखरुप पुन्हा राहुल यांना मिलाल्यामुले त्यांना मोठा दिलासा मिळालाय.

संबंधित बातम्या :

सोलापुरात हॉटेल कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, हरवलेली एक तोळ्याची सोन्याची अंगठी ग्राहकाच्या स्वाधीन

दिल्लीतून पळाली, पालघरात मिळाली! सजग रिक्षाचालकामुळं लेक सापडली

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.