anant ambani wedding: अनंत अंबानी याच्या लग्नामुळे मुंबईतील वाहतुकीत बदल, आजपासून तीन दिवस निर्बंध
anant ambani wedding: विवाह समारंभास जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे. बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असणार आहे. 12 जुलै दुपारी 1 वाजेपासून 15 जुलै मध्यरात्रीपर्यंत बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.
रिलायन्स इंडिस्ट्रीजचे प्रमुख आणि देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी याचे मुंबईत 12 जुलै रोजी लग्न आहे. प्रसिद्ध उद्योगपती एनकोर हेल्थकेयरचे सीईओ वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंटसोबत अनंत विवाहबद्ध होणार आहे. या विवाह समारंभास जगभरातून व्हिव्हिआयपी येणार आहेत. त्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी 12 ते 15 जुलैपर्यंत मुंबईतील वाहतुकीत बदल केला आहे. बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असणार आहे. 12 जुलै दुपारी 1 वाजेपासून 15 जुलै मध्यरात्रीपर्यंत बीकेसी परिसरात वाहतुकीवर निर्बंध असणार आहेत.
असा असणार बदल
- लक्ष्मी टॉवर जंक्शन-धीरूभाई अंबानी स्क्वेअर एव्हेन्यू लेन 3-इंडियन ऑइल पेट्रोल पंप-डायमंड जंक्शन-हॉटेल ट्रायडेंटकडून कुर्ला एमटीएनएलकडे जाणाऱ्या वाहतुकीवर बंदी असणार आहे. लग्नासाठी आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या वाहनांनाच येथे परवानगी असणार आहे.
- पर्याय म्हणून वन बीकेसीकडून येणारी वाहने लक्ष्मी टॉवर जंक्शन, डायमंड गेट क्रमांक ८, नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळू शकतात. डायमंड जंक्शनपासून उजवीकडे वळून धीरूभाई अंबानी चौकातून बीकेसीकडे जाता येईल.
- कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून धीरूभाई अंबानी चौकातील बीकेसी कनेक्टरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. या भागात लग्नासाठी आमंत्रित केलेल्या लोकांचीच वाहने प्रवेश करू शकतील.
- पर्याय म्हणून, कुर्ला, एमटीएनएल जंक्शन, प्लॅटिना जंक्शन, डायमंड जंक्शन येथून येणारे वाहनचालक नाबार्ड जंक्शन येथून डावीकडे वळून डायमंड गेट क्रमांक 8 मधून पुढे जातील. हे लक्ष्मी टॉवर जंक्शन येथून उजवीकडे वळून बी
- भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क्स, गोदरेज येथून येणारी वाहतूक जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक २३ वर प्रतिबंधित असणार आहे. येथून वाहतूक यूएस कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाईल.
- अमेरिकन दुतावास, जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी कनेक्टरकडे जाताना एमटीएनएल जंक्शनकडून येणारी वाहतूक सन टेक बिल्डिंग येथे थांबवण्यात आली आहे.
- अंबानी चौक ते लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंतचा लतिका रस्ता वाहतुकीसाठी एकेरी करण्यात आला आहे.
- कौटिल्य भवन ते अमेरिकन कॉन्सुलेटपर्यंत एव्हेन्यू 3 रोडवर एकेरी वाहतूक सुविधाही असेल.
Non Stop LIVE Update