Angarki Sankashti Chaturthi 2021 | अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट, पुण्यात मात्र भाविकांची गर्दी
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर यांसह विविध प्रसिद्ध गणपती मंदिराबाहेरच अनेक भाविक दर्शन घेऊन परतत आहेत.
मुंबई : आज 27 जुलै म्हणजे आषाढ कृष्ण चतुर्थी. चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी (Angarki Sankashti Chaturthi 2021) म्हणून ओळखली जाते. म्हणून त्याला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं. आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त विविध गणपती मंदिरात गर्दी करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर यांसह विविध प्रसिद्ध गणपती मंदिराबाहेरच अनेक भाविक दर्शन घेऊन परतत आहेत. (Angarki Sankashti Chaturthi 2021 SiddhiVinayak Ganpati temple Rush devotee)
24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था
दरवर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील दादर परिसरात असलेले प्रसिद्ध सिद्धीविनायक गणपती मंदिरात अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळत असे. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे. राज्यात कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना 24 तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड-19 संसर्ग निर्बंध नियमावलीनुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे.
बाप्पा कोरोना संकट दूर कर, भाविकांची प्रार्थना
अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिराच्या परिसरामध्ये सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र काही गणेशभक्त आज पहाटेपासून सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. पण मंदिर बंद असल्याने त्यांना गेटबाहेरुनच दर्शन घेऊन परतावे लागत आहे. यातील असंख्य भाविक हे बाप्पाकडे कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर गर्दी
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दगडूशेठ गणपतीचे मंदिर बंद असल्याने अनेक लोक रस्त्यावर थांबून गणपतीचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच रस्त्यात मध्येच थांबणाऱ्या लोकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
(Angarki Sankashti Chaturthi 2021 SiddhiVinayak Ganpati temple Rush devotee)
संबंधित बातम्या :
देवाच्या पूजेमध्ये जपमाळेचे बरेच महत्त्व; जाणून घ्या कुठल्या माळेने कुठल्या देवतेची पूजा करायची?
सोमवारी उपवास करणाऱ्यांवर भगवान शंकर होतात प्रसन्न; जाणून घ्या श्रावणातील सणांचे महत्त्व
Ashadhi Ekadashi 2021 | अवघे गरजे पंढरपूर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न