सचिन वाझे ते मुकेश अंबानी यांचा ओझरता उल्लेख, जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय?

जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुख यांनी सचिन वाझेवर टीका करताना उद्योगपती मुकेश अंबानी यांचादेखील ओझरता उल्लेख केला.

सचिन वाझे ते मुकेश अंबानी यांचा ओझरता उल्लेख, जेलमधून बाहेर येताच अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय?
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 5:30 PM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जेलमधून बाहेर येताच सचिन वाझेवर टीका केली. सचिन वाझेने केलेले आरोप खोटे होते. याउलट सचिन वाझेवरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. मला खोट्या आरोपांमध्ये गोवण्यात आलेलं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. यावेळी अनिल देशमुख यांनी सचिन वाझेवर टीका करताना उद्योगपती मुकेश अंबानी यांचादेखील ओझरता उल्लेख केला.

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप केला. पण त्याच परमबीर सिंह यांनी चांदीवाल कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्रक दिलं की, मी अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले ते ऐकीव माहितीवर केले. त्याच्याबद्दल माझ्याकडे काहीच पुरावा नाही”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला.

“हायकोर्टाच्या निर्णयामध्ये जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे, त्यामध्ये परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहे. अशा आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

“सचिन वाझेला आतापर्यंत दोन खुनांच्या आरोपांखाली अटक झालीय. त्याला तीनवेळा सस्पेंड करण्यात आलंय. एकदा त्याला सोळा वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आलं. एकदा मुंबईतील उद्योगपतीच्या (मुकेश अंबानी) घराबाहेर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती. अशा व्यक्तीवर विश्वास ठेवता येणार नाही, असं निरीक्षण हायकोर्टाने केलं”, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

“माझ्यावर झालेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असंदेखील निरीक्षण हायकोर्टाने केलेलं आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला. मी त्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो”, अशी पहिली प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख यांना 1 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती. ईडी आणि सीबीआय अशा दोन यंत्रणांनी त्यांच्याविरोधात तपास केलाय. दोन्ही यंत्रणांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. गेल्या अकरा महिन्यांपासून ते जेलमध्ये होते. अखेर त्यांची सुटका झालीय.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून आर्थर रोड जेल ते सिद्धीविनायक मंदिर अशी बाईक रॅली काढली जाणार आहे. अनिल देशमुख आधी श्री सिद्धीविनायकांचं दर्शन घेतील. त्यानंतर ते कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थीन जाऊ शकतात.

कोर्टाने अनिल देशमुख यांना जामीन देताना मुंबई सोडायची नाही, अशी अट ठेवली आहे. त्यामुळे देशमुखांना सध्यातरी त्यांच्या मतदारसंघात आणि नागपूर येथील घरी जाता येणार नाही. त्यांना सध्या मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी राहावं लागेल. याशिवाय पोलीस चौकशीसाठी त्यांना बोलावलं तर पोलीस ठाण्यात जावं लागेल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.