पतीला भेटताच हुंदका दाटून आला, अनिल देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर

अनिल देशमुख यांची आज जेलमधून सुटका झाल्यानंतर ते आपल्या पत्नी आरती देशमुख यांना भेटले. यावेळी देशमुख दाम्पत्य अतिशय भावूक झालं. दोघांच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलं. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांना रडू कोसळलं.

पतीला भेटताच हुंदका दाटून आला, अनिल देशमुख यांच्या पत्नीला अश्रू अनावर
Follow us
| Updated on: Dec 28, 2022 | 7:20 PM

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या वर्षभरापासून जेलमध्ये होते. त्यांच्यावर शंभर कोटी घोटाळ्याचे गंभीर आरोप होते. त्यांच्याविरोधात तब्बल दोन-दोन केंद्रीय तपास यंत्रणा तपास करत होत्या. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून त्यांना जामीन मिळत नव्हता. त्यांना जामीन मिळवण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड प्रयत्न करावे लागले, प्रचंड झटावं लागलं. पण देशमुखांपुढील अडचणी काही कमी होत नव्हत्या. या दरम्यानच्या काळात अनिल देशमुख गंभीर आजारीदेखील पडले. त्यांच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गेल्या वर्षभराच्या सर्व खडतर प्रवासानंतर आज अखेर अनिल देशमुख यांची सुटका झालीय. जेलमधून सुटका झाल्यानंतर ते आज आपल्या पत्नी आरती देशमुख यांना भेटले. यावेळी देशमुख दाम्पत्य अतिशय भावूक झालं. दोघांच्या डोळ्यांमध्ये पाणी तरळलं. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख यांना रडू कोसळलं.

अनिल देशमुख यांचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांकडून आर्थर रोड कारागृहाबाहेर जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर आर्थर रोड कारागृह ते सिद्धीविनायक मंदिर अशी राष्ट्रवादी काँग्रेसची बाईक रॅली निघाली.

अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची बाईक रॅली सिद्धिविनायक मंदिर येथे पोहोचल्यानंतर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. देशमुखांच्या पत्नी आरती देशमुख आणि इतर कुटुंबिय सु्द्धा तिथे उपस्थित होते. देशमुख आपल्या पत्नीसह श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार होते. या दरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आरती देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

आरती देशमुख यावेळी प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. प्रसारमाध्यमांचे सर्व कॅमेरे आरती देशमुख यांच्याकडे खिळले तेव्हा आरती यांना रडू कोसळलं. त्यांचे डोळे त्यांची प्रतिक्रिया देत होते.

गेल्या वर्षभरात इतकं सारं काही पाहिलं, त्यानंतर आज अखेर आपल्या पतीची सुटका झालीय. आरती यांना पत्रकार प्रश्न विचारत होते पण आरती यांनी मौन पाळलं. त्यांना बोलता आलं नाही आणि त्यांचा हुंदका दाटून आला. यावेळी देशमुखांनी आपल्या पत्नीला सावरलं. हे सगळं पाहून तिथे उपस्थित असलेल्या पत्राकारांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.