Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ

महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगानेही अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान देशमुख यांचे वकील युक्तिवादासाठी हजर न राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 5:27 PM

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. देशमुखांची न्यायालयीन कोठडी आज संपली होती. त्यामुळे त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने देशमुखांना कोणताही दिलासा दिला नाही. देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगानेही अनिल देशमुख यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान देशमुख यांचे वकील युक्तिवादासाठी हजर न राहिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड सीएम रिलीफ फंडात जमा करण्याचे निर्देश दिले होते.

अशा प्रकारे झाली अनिल देशमुखांना अटक

अटकेनंतर देशमुख यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवले होते. यापूर्वी ईडीने पाच वेळा समन्स बजावूनही ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते. ईडी आणि सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात सुरू असलेल्या चौकशीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. अनिल देशमुखांना अटक करण्यापूर्वी ईडीने त्यांच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयनेही छापे टाकले.

100 कोटींची वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी सीबीआय आणि ईडीचा तपास सुरुय

मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार जप्त करण्यात आली होती. यानंतर त्या गाडीचा मालक मनसुख हिरेनचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली होती. पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या मेलमध्ये मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून 100 कोटींची वसुली करण्यासाठी अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांचा वापर करीत असल्याचा आरोप केला होता.

यानंतर देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढे देशमुख यांची मनी लाँड्रिंगची प्रकरणेही समोर आली. सीबीआयने 100 कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा ईडीनेही त्याच्याविरुद्ध तपास सुरू केला. अनिल देशमुख सध्या आर्थर रोड कारागृहात आहेत. (Anil Deshmukh’s jail term extended to 14 days in judicial custody)

इतर बातम्या

Pimpri-Chinchwad crime | हिंजवडीत विद्युत डीपीवर चढून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ; अग्नीशामक दलाने वाचवाला जीव

Kanpur raid Piyush Jain: अब्जोंची कॅश बाळगणारे पियुष जैन आता तुरुंगात झोपत आहेत फरशीवर

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.