मोठी बातमी : अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत, साई रिसॉर्टप्रकरणी समन्स

काल अनिल परब यांना नोटीस देण्यात आली होती. पण ते आज हजर राहणार नाहीत, काही नियोजित कामांमुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत. मात्र त्यांच्या वकीलांच्या वतीने पुढची तारीख मागून घेण्यात येणार आहे.

मोठी बातमी : अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत, साई रिसॉर्टप्रकरणी समन्स
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:07 AM

मुंबई : अनिल परब ईडी चौकशीला जाणार नाहीत, अशी माहिती आहे. साई रिसॉर्टप्रकरणी त्यांना समन्स पाठवण्यात आला आहे. ईडीने दापोलीतील रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांना समन्स बजावली होती. आज त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आज 11 वाजता त्यांची चौकशी होणार होती. पण आधीच्या नियोजित कामामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत. मात्र अनिल परब यांचे वकील ईडी कार्यालयात जाणार आहेत आणि काही कामामुळे परब हजर राहणार नसल्याची माहिती देतील. तसंच पुढची तारीख मागून घेतील, अशी माहिती आहे.

अनिल परब यांना समन्स, चौकशीला गैरहजर

परिवहन मंत्री अनिल परबांच्या मुंबईतील घरावर, कार्यालयावर आणि रत्नागिरीतील रिसॉर्टवर तसेच परबांच्या निकटवर्तीयांवर मागच्या काही दिवसांपूर्वीच ईडीने धाडसत्र सुरू केलं आहे. त्यानंतर तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून काही कागदपत्रही ताब्यात घेतली होती. काल त्यांना नोटीस देण्यात आली होती. पण ते आज हजर राहणार नाहीत, काही नियोजित कामांमुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत. मात्र त्यांच्या वकीलांच्या वतीने पुढची तारीख मागून घेण्यात येणार आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

गेल्या अनेक दिवासांपासून याच रिसॉर्टवरून अनिल परब यांच्यावर अनेक आरोप भाजपकडूनही केले जात आहेत. साई रिसॉर्ट गैरव्यवहार प्रकरणाची ईडीकडून सध्या कसून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात ईडीने सात ठिकाणी छापेमारी केली होती. तसेच ईडीकडून सर्च ऑपरेशनमध्ये अनेक कागदपत्रं ईडीने ताब्यात घेतली होती.

हे सुद्धा वाचा

याच प्रकरणात आता आज मुंबईतील ईडी कार्यालयात अनिल परबांनी चौकशीली अजर राहावे, असे आदेश देण्यात आले होते. या रिसॉर्टसाठी केलेला खर्च बेनामी आहे असा संशय संध्या ईडीला आहे. या प्रकरणात ईडीने अनेकांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. तसेच यात परब यांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.