एसटी विलीनीकरणाचा मुद्दा धोरणात्मक, निर्णयाला वेळ लागणार-अनिल परब
उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा निर्णय हा वाचण्यात आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयाचे पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.
मुंबई : आज पुन्हा एसटीच्या विलीकरणाच्या (St Merger) सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे आजही एसटी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा (St Worker Strike) मुद्दा तापला आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. उच्च न्यायालयामध्ये आज समितीचा निर्णय हा वाचण्यात आला आहे आणि त्या समितीच्या निर्णयाचे पत्र कर्मचाऱ्यांच्या वकिलांना देण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.तसेच कोरोना काळात मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवाराला आम्ही 50 लाख रुपये दिले आहे आणि जे नियमात बसणार नव्हते त्यांना देखील आम्ही 5 लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की कामावर तुम्ही या आम्ही कामावर तुम्हांला घेण्यासाठी तयार आहोत, अशी साद अनिल परबांनी घातली आहे.
खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
पुढे बोलताना अनिल परब म्हणाले, लोकांचे हाल थांबवा आणि कामावर या हे आवाहन आम्ही वारंवार करत आहोत, एसटी विलानीकरन चा निर्णय हा धोरणात्मक आहे. आणि काही वृत्तपत्रांनी ही खोडसाळ बातमी दिली आहे की कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कपात होणार आहे म्हणून पण ही गोष्ट चुकीची आहे. असेही स्पष्टीकरण यावेळी परबांनी दिले आहे. संपात एसटीचे नुकसान प्रचंड झालं आहे, पण असा कोणताच निर्णय झाला नाही आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी घाबरू नये असे परब म्हणाले. तसेच एसटीचा अहवाल मी वाचला नाही. त्यामुळे त्यावर मुख्यमंत्र्यांची सही आहे की नाही हे मी आत्ता सांगू शकत नाही, असेही परबांनी सांगितले.
पुन्हा तारीख पे तारीख
एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण आजही या याचिकेवर सुनावणीला कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल 109 दिवस विलीनीकरणासाठी संप पुकारला होता. सुरूवातील आंदोलन सुरू झाल्यानंतर दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं.
एसटी कर्मचाऱ्यांना भाजपनं उचकावलं आणि साथ सोडली, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा
एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर शुक्रवारी सुनावणी, विलीनीकरणाच्या याचिकेला तारीख पे तारीख
अमिर खानच्या ‘सोयाबीन शाळेत’ महाराष्ट्रातील शेतकरी होणार का पास? नेमका उद्देश काय?