Maratha reservation | EWSचा मराठा आरक्षणावर परिणाम होणार नाही; अनिल परब यांचं मोठं विधान

EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. (anil parab statement on ews reservation for maratha community)

Maratha reservation | EWSचा मराठा आरक्षणावर परिणाम होणार नाही; अनिल परब यांचं मोठं विधान
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सचिन वाझेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 2:50 PM

मुंबई: EWS आरक्षणाला माझा विरोध नाही, पण याचा धोका SEBC ला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला केलेला असतानाच त्यावर सरकारकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. EWS आरक्षणाचा मराठा आरक्षणावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली आहे. (anil parab statement on ews reservation for maratha community)

प्रसारमाध्यमांशाी संवाद साधताना अनिल परब यांनी मराठा आरक्षणावरील सरकारची भूमिका स्पष्ट केली. मराठा संघटनात वेगवेगळे मतप्रवाह दिसत आहेत. या संघटनांनी एकत्र येवून निर्णय द्यायला हवा. EWS च्या मागणीसाठी काही विद्यार्थी कोर्टात जातायत व त्यांना ते द्यावं लागतंय. हा काही एका जातीपुरता निर्णय नाही, तर गरीब घटकांसाठीचा निर्णय आहे. याचा मराठा आरक्षणावर फरक पड़त नाही, असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

नाणारवरून यूटर्नचा प्रश्नच नाही

यावेळी त्यांनी नाणारबाबतची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. नाणार बाबत आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केलेलं मत ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्याचा पक्षाशी संबंध नाही. पक्षाची भूमिका पक्षप्रमुख किंवा पक्षाचे प्रवक्ते मांडत असतात. कोणताही निर्णय पक्षप्रमुख घेत असतात आणि त्यांनी नाणारबाबतची भूमिका वेळोवेळी स्पष्ट केलेली आहे, असं सांगतानाच त्यामुळे नाणारवरून यूटर्न घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ग्रामपंचायतीत ताकद दिसली पाहिजे

ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्ष म्हणून लढवल्या जात नसतात. स्थानिक पातळीवरील नेते निवडणुकीबाबतचा निर्णय घेत असतात. परंतु महाविकास आघाडीची ताकद दिसली पाहिजे म्हणून काही गोष्टी करणं भाग आहे. शिवाय आघाडीचा धर्मही दिसला पाहिजे, त्यासाठी एकत्रित लढण्याबाबत विचार सुरू असल्याचंही ते म्हणाले.

त्यांची कीव येते

येणारे काही दिवस धोक्याचे आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूने परदेशात टेन्शन निर्माण केलं आहे. त्यामुळे आपल्यालाही काळजी घ्यावी लागत आहे. रात्री सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. थर्टी फर्स्टला होणारी गर्दी लक्षात घेऊन रात्रीचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. रात्रीचा कोरोना असतो का म्हणणाऱ्यांची कीव येते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

नाहीतर म्हणणारे भरपूर पाहिलेत

संभाजीनगर हे नाव आमच्या हृदयात आहे. आम्ही नेहमीच औरंगाबादला संभाजीनगरच म्हणतो. मनसेची बॅनरबाजी केवळ निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेली आहे. मनसेच्या होर्डिंगमध्ये ‘नाहीतर’ असं लिहिलं आहे. असे अनेक ‘नाहीतर’ आम्ही पाहिले आहेत, अशा पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, अशा शब्दांत त्यांनी मनसेला ठणकावले. (anil parab statement on ews reservation for maratha community)

काय म्हणाले होते संभाजीराजे?

“आतापर्यंत मी सरकार सकारात्मक असल्याचं म्हणत होतो. पण आता आपल्याला गडबड वाटत आहे. 25 जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं वाटत आहे म्हणून हा EWSचा मुद्दा रेटला जात आहे का?” असा प्रश्न संभाजीराजे यांनी विचारलाय. सरकार ठोस भूमिका घ्यायला तयार नाही. सरकारच्या भूमिकेत आता आपल्याला गडबड दिसून येत असल्याचं खळबळजनक वक्तव्य संभाजीराजे यांनी केलंय. येत्या 25 जानेवारीच्या सुनावणीत काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असेल, अशी आक्रमक भूमिका खासदार संभाजीराजे यांनी घेतलीय.

EWSचा मुद्दा आला कुठून?

मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असल्यानं हे आपल्या लक्षात आल्याचं संभाजीराजे म्हणाले. विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असं सांगत आर्थिक दुर्बल घटक म्हणून कालच्या बैठकीत आरक्षण दिलं. मग सूपर न्यूमर पद्धतीनं ठरलेलं असताना अचानक EWSचा मुद्दा आला कुठून? असा प्रश्न संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला आहे. (anil parab statement on ews reservation for maratha community)

संबंधित बातम्या:

राज्य सरकारच्या भूमिकेत गडबड!, खासदार संभाजीराजे आक्रमक

Maratha reservation | काही मंडळींचा राजकीय खेळ सुरु! अशोक चव्हाणांचा कुणावर निशाणा?

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

(anil parab statement on ews reservation for maratha community)

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.