सुप्रिया सुळे यांना मेसेज, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल; काय घडलं अंजली दमानिया यांच्याबाबत?

"सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी त्यांना एक मेसेज पाठवला. आताच्या घडीला मला या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची आहे. ते तुमच्या पक्षात आहे. माझी विनंती आहे की तुम्ही यात लक्ष घालावं. आणि खरंच सांगायचं म्हणजे ३० सेंकदात मला फोन आला. मला म्हणाल्या अगं हे असं खरंच आहे? मी म्हटले हो. धीस इज फॅक्ट. तुम्हाला येऊन बघायचं असेल तर बघा. त्या म्हणाल्या, मी बारामतीत आहे. मी कुणाला तरी पाठवते. त्यांनी कुणाला तरी पाठवलं", असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.

सुप्रिया सुळे यांना मेसेज, राष्ट्रवादीच्या कार्यालयात दाखल; काय घडलं अंजली दमानिया यांच्याबाबत?
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 10:20 PM

मुंबई | 2 जानेवारी 2024 : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डोरिन फर्नांडिस यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी काय-काय प्रयत्न केले? या विषयी सविस्तर माहिती दिली. दमानिया यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आपण तक्रार केली तेव्हा त्यांनी मदतीसाठी प्रयत्न केले, असं दमानिया यांनी सांगितलं. पण तरीही मंत्री छगन भुजबळ यांनी फर्नांडिस कुटुंबियांना पैसे देण्यास प्रचंड टाळाटाळ केली. “मी सुप्रिया सुळेंना भेटले होते. त्यांनी वायबी सेंटरवर बैठका ठेवल्या होत्या. माझं आणि पवार कुटुंबाचं जराही पटत नाही. कारण मला असं वाटतं की भ्रष्टाचार जो सुरू झाला तो पवार कुटुंबापासूनच सुरू झाला. सिंचन घोटाळ्यासह अनेक प्रकरणात मी त्यांच्या विरोधात लढले होते”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

“सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवेल असं मला कधी वाटलं नव्हतं. मी त्यांना एक मेसेज पाठवला. आताच्या घडीला मला या कुटुंबाला मदत मिळवून द्यायची आहे. ते तुमच्या पक्षात आहे. माझी विनंती आहे की तुम्ही यात लक्ष घालावं. आणि खरंच सांगायचं म्हणजे ३० सेंकदात मला फोन आला. मला म्हणाल्या अगं हे असं खरंच आहे? मी म्हटले हो. धीस इज फॅक्ट. तुम्हाला येऊन बघायचं असेल तर बघा. त्या म्हणाल्या, मी बारामतीत आहे. मी कुणाला तरी पाठवते. त्यांनी कुणाला तरी पाठवलं. ते सर्व पाहिलं. बघितल्यावर, खात्री पटल्यावर सुप्रिया सुळे हळव्या झाल्या. त्यानंतर त्यांनी आमचा व्हॉट्सअप ग्रुप केला. त्यात मी होते, सुप्रिया सुळे होत्या, समीर भुजबळ होते, त्यांचे वकील होते. माझे आम आदमी पार्टीचे काही सहकारी आणि डोरिन फर्नांडिस होते. यात तारखा ठरल्या. मिटिंग ठरल्या. वायबी चव्हाण सेंटरवर”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं.

‘तुम्हाला साडे आठ कोटी द्यायला एक वर्ष लागणार आहे?’

“राष्ट्रवादीच्या कार्यालयात मी पाऊलही कधी टाकलं नसतं. पण या कुटुंबाची स्थिती बघून मला तिथे जावं लागलं. मी तिथे जाऊन त्यांना भेटले. शेवटी जानेवारी महिन्यात सुप्रिया ताईंच्या हस्तक्षेपामुळे एक किंमत ठरली. त्या म्हणाल्या निदान साडे आठ कोटी रुपये तरी तुम्ही द्या. साडे आठ कोटी ठरले. पण एक नाही दोन नाही. पैसे द्यायला आम्हाला एक वर्ष लागेल असं आम्हाला सांगण्यात आलं. तेव्हा मी हसले. तुमच्याकडे इतकी कोट्यवधी रुपये असताना तुम्हाला साडे आठ कोटी द्यायला एक वर्ष लागणार आहे? असा सवाल मी केला. त्यावर ते म्हणाले, हो”, असं दमानिया यांनी सांगितलं.

‘सुप्रिया ताईंनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर अनेकवेळा मेसेज केले, पण…’

“खरंतर त्याचा उलगडा मला नंतर झाला. कारण ते पक्ष बदलणार होते. मग सुप्रिया ताईंचा कंट्रोल राहिला नसता. त्यामुळे मग कोण द्यायला लावणार मला असं त्यांना वाटलं असेल. त्यानंतर जून महिन्यात त्यांनी पक्ष बदलला. अजितदादांबरोबर ते भाजपसोबत गेले. त्यानंतर मस्त मजाच चालली होती. कोणीच द्यायला तयार नव्हतं. सुप्रिया ताईंनी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर अनेकवेळा मेसेज केले. तुम्ही पैसे देणार आहात. तर ताबडतोब द्या. राजकारण बाजूला ठेवूया. तुम्ही द्या हे पैसे, असे मेसेज सुप्रिया सुळेंनी टाकले. पण त्यांना ते जुमानले नाहीत”, असा दावा दमानिया यांनी केला.

‘तुम्ही इतकी खालच्या दर्जाची माणसं आहात?’

“जेव्हा जरांगे पाटील आणि त्यांचा वाद सुरू झाला. त्यावेळी छगन भुजबळांची मुलाखत पाहिली. ते म्हणाले, मी माझ्या कष्टाचं खातो. हे ऐकून माझं डोकं फिरलं. मग मी तेव्हा ट्विट केलं आणि पत्रकार परिषद घेतली. अशा लोकांना ते ओरबाडून खात असल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर दीड दीड वर्ष मिटिंगा होऊन, २० वर्ष फर्नांडिस कुटुंबाला त्रास दिला. दीड वर्ष आम्ही लढतो, सुप्रिया ताई तुम्हाला १०० वेळा सांगत होत्या. तरी तुम्ही कुणाचं ऐकत नाही. तुम्ही इतकी खालच्या दर्जाची माणसं आहात?” असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.