Anjali Damania : वाल्मिक कराडची ती ऑडिओ क्लिप व्हायरल; धनंजय मुंडेंबाबत अंजली दमानिया आक्रमक, केली ही मोठी मागणी
Anjali Damania on Dhananjay Munde : 'पोरगा सोडून द्या, मी बीड जिल्ह्याचा बाप आहे', अशी एक कथिक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. त्यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

एका प्रकरणात मुलाला सोडून द्या, असे पोलीस अधिकाऱ्याला सांगत, त्या मुलाला आपणच बीड जिल्ह्याचा बाप आहे, काळजी करू नको, अशी वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. महिला सायबर अधिकाऱ्याशी झालेला हा संवाद झाला. त्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
अंजली दमानिया आक्रमक
वाल्मीक कराड आणि सायबर पोलीस अधिकारी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता अधिक आक्रमक झाल्या आहे. पोलीस हे वाल्मीक कराड पुढे झुकत असल्याचे अनेकदा दिसून आले. यापूर्वी एक SP देखील वाल्मीक कराड याचे आशीर्वाद घेताना दिसून आले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. इथे तुमचा (बाप) बॉस बसला आहे, ही गुंडगिरीची भाषा आहे, यासाठी या सर्वांचा बॉस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.




अजितदादांना पुरावे दिले
अजित पवार धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहेत म्हणून मी त्यांना भेटले..कारण त्या पक्षाकडून एकदा नाही दोनदा असं सांगण्यात आलं की जोपर्यंत पुरावे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही राजीनामा घेणार नाही. म्हणून मी पुरावे घेऊन भेटायला गेले, असे त्यांनी स्पष्ट केले.
राखेसंदर्भात पुन्हा दादांना भेटेन
धनंजय मुंडे यांनी एक स्पष्टीकरण दिलं की 2007 मध्ये ही फुकट दिली जायची पण ती 2007 मध्ये फुकट दिली जायची त्याच्यानंतर ही फ्लाय ऍड करून विकली जात होती. सगळे डिटेल्स त्यांनी लपवले असतील तर मी पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाऊन त्यांची माहिती देईल, असे त्या म्हणाल्या.
मुंडेंनी राजीनामा नाही दिला तर आता PIL
धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा दिला नाही तर PIL दाखल करणार असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या. या जनहित याचिकेत प्रत्येक व्यक्तीला आरोपी करणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यामुळे आता हे प्रकरण न्यायालयीन कचाट्यात जाण्याची शक्यता आहे.