Anjali Damania : अजितदादांबद्दल आज मोठा गौप्यस्फोट? अंजली दमानिया पत्रकार परिषद घेऊन कोणता भांडाफोड करणार? राष्ट्रवादीत खळबळ?

Anjali Damania on Ajit Pawar : लोकसभा निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागे शनी जणू हात धुवून लागला होता. स्वकीय, महायुतीतील घटक पक्ष, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांनी तिखट प्रहार केले होते. त्यानंतर अंजली दमानिया यांनी पण उरली सरली कसर काढून घेतली होती.

Anjali Damania : अजितदादांबद्दल आज मोठा गौप्यस्फोट? अंजली दमानिया पत्रकार परिषद घेऊन कोणता भांडाफोड करणार? राष्ट्रवादीत खळबळ?
अंजली दमानिया अजितदादांबाबत काय गौप्यस्फोट करणार?
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 10:39 AM

लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांविरोधात स्वकीय, महायुतीतील मित्र आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने एकदम मोर्चा उघडला होता. चोहो बाजूंनी त्यांच्यावर तोफगोळे डागण्यात आले. तर मे महिन्याच्या अखेरीस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आता दमानिया यांनी पुन्हा अजितदादा खेम्याविरोधात मोर्चा उघडला आहे. अजितदादांबद्दल आज मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. अंजली दमानिया पत्रकार परिषद घेऊन कोणता भांडाफोड करणार, याकडे राष्ट्रवादी पक्षासह महायुतीचे पण लक्ष लागले आहे.

प्रत्येक पक्षात राम-श्याम

माझा लढा नितीन गडकरी, सुनील तटकरे, छगन भूजबळ, अजित पवार यांच्याविरोधात सुरूच ठेवलाय, प्रत्येक मोठ्या पक्षात राम आणि श्याम टाईप लोकं राहतात. फडणवीसांवर बोललं तर प्रसाद लाड दरेकर बोलतात. अजितदादांवर बोललं तर अमोल मिटकरी आणि सुरज चव्हाण वाट्टेल ते बोलतात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

भांडाफोड करणार

मिटकरी वाईट बोलत नाही पण सुरज चव्हाण यांना बोलण्याचा तारतम्य नाही, या सुरज चव्हाण मुळे माझा संताप शिगेला जातोय. याला आत्ता मी सरळ करणार त्यांच्या मालकांना सरळ करणार आहे. मी किती तत्वावर काम करतेय हे त्यांना माहित नाही. मी त्यांना रितसर धडा शिकवणार आहे. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत यांचा भांडाफोड करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सुरज चव्हाण यांना धडा शिकवणार

माझ्या ऊत्पन्नाचं स्तोत काय आहे ते सांगणार आहे. गुलाबी गाड्या कुठून आल्या पैसा कुठून आल्या, दादांनी ४० गाड्या कुठून आणल्या. रिचार्जवर चालणारी बाई म्हणतात, सुरज चव्हाण यांना मी धडा शिकवणार. जनसन्मान यात्रा काढतात आणि मोटारसायकलवर बायका फिरवल्या म्हणता, आदर नाही मर्यादा नाही मग तूमचे चिल्लर पिल्ले असेच शब्द वापरतात. मी सगळे काही उलगडेन यानंतर तुम्हीही करा. माझ्याकडे मेहनतीचे पैसे, तुमच्यासारखे काळे पैसे नाहीत, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला. गडकरी यांनी तर माझे सगळे डिटेल्स काढले पण काहीच सापडलं नाही, मग तुम्हाला मी काही घाबरणार नाही, गप्प बसणार नाही. जनसन्मान यात्रा काढतात, लोकांना रोजगार देताय का ? काय उपयोग झाला, असा सवाल दमानिया यांनी विचारला.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....