Nawab Malik | मलिकांविरोधात आणखी एक अब्रू नुकसानीचा दावा, तर समीर वानखेडे मुदतवाढ नाकारणार?

वानखेडे कुटुंबीयांनी याआधीही मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचे दावा दाखल केले होते. त्यानंतर आता आणखी एक अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आता कोर्टात काय सुनावणी होते, याकडे सगळ्यांची नजर लागली आहे.

Nawab Malik | मलिकांविरोधात आणखी एक अब्रू नुकसानीचा दावा, तर समीर वानखेडे मुदतवाढ नाकारणार?
ncp leader nawab malik
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 6:18 PM

मुंबई : एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची बहीण यास्मिन वानखेडे यांनी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या विरोधात अब्रू नुकसानाचीचा दावा ठोकलाय. अंधेरी कोर्टात (Andheri Court) हा अब्रू नुकसानीचा दावा करण्यात आला आहे. यास्मिन यांच्या वकिलांनी याबाबतची माहिती दिली आहे.

yasmin wankhede

yasmin wankhede

माध्यमांमध्ये चुकीचे आरोप करुन ट्विटरच्या चुकीच्या पोस्ट टाकून बदमान केल्याचा कट आखल्याचा आरोप यास्मिन वानखेडे यांनी मलिकांविरोधात केलाय. दरम्यान, याआधीच वानखेडे कुटुबीयांनी नवाब मलिकांविरोधात वेगवेगळे अब्रू नुकसानीचे खटले कोर्टात दाखल केले आहेत. त्यावर सुनावणीही सुरुवात आहे. आता त्यात आणखी एका अब्रू नुकसानीच्या दावाच्या भर पडली आहे.

अब्रूनुकसानीचा खटला

समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुलगी यास्मिनआधीच बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. प्रसारमाध्यमं, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.

मलिकांना हायकोर्टानं फटकारलं!

Bombay High Court

Bombay High Court

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मुंबई हायकोर्टाने 25 नोव्हेंबरला जोरदार झटका दिला होता. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई हायकोर्टाला दिली होती.

यास्मिन मलिकांना म्हणाल्या होत्या ‘मेंटल’

दरम्यान, यास्मिन वानखेडे यांनी आपला मेंटल स्टेटस चेक करावा असं वक्तव्य 2 नोव्हेंबरला केलं होतं होतं. मलिकांनी सोशल मीडिया आणि पत्रकार परिषदा घेत समीर वानखेडेंवर एकच हल्लाबोल केला होता. त्यांना उत्तर देताना यास्मि यांनी मलिकांवरही पलटवार केला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांना या संपूर्ण प्रकरणी मौन बाळगलं असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

वानखेडे वर्षाअखेरीस कार्यकाळ संपवणार?

sameer wankhede

sameer wankhede

दरम्यान, 31 डिसेंबरला समीरल वानखेडेंचा कार्यकाळ संपणार असल्याची माहिती समोर येते आहे. एनसीबीचे झोन डायरेक्टर असणारे समीर वानखेडे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं चर्चेत आले होते. आता ते आपल्या पदासाठी कार्यकाळ वाढवून घेणार नसल्याची माहिती समोर आली आहे. वर्षाअखेरीस त्यांचा कार्यकाळ संपत असल्याचं सांगितलं जातंय. 2008च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असलेले समीर वानखेडे 2020 साली एनसीबीच्या मुंबई शाखेचे झोनल डायरेक्टर म्हणून काम पाहू लागले होते.

इतर बातम्या – 

Attack on Shiv Sena Activist | शिवसेना कार्यकर्त्यावर कणकवलीत तलवारीनं हल्ला! हल्ल्यामागे राणेंचा हात?

Video | Pune Expressway Truck Fire | एक्स्प्रेस हायवेवर आगडोंग! ट्रकनं पेट घेतल्यानं वाहतुकीवर परिणाम

क्षणाचाही विलंब न लावता कानडी अत्याचाराची दखल घ्या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना आवाहन

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.