OBC आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात आणखी एक याचिका
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आणखी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. याचिका अॅड. राजेश टेकाळे यांनी ही याचिका दाखल केली असून, ओबीसी समाजाला देण्यात आलेलं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे ज्या जातींना चुकीच्या पद्धतीने ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलंय, त्या जातींना ओबीसी आरक्षणातून वगळा आणि त्या जागी मराठा समाजाला घ्या, […]
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आणखी एक याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. याचिका अॅड. राजेश टेकाळे यांनी ही याचिका दाखल केली असून, ओबीसी समाजाला देण्यात आलेलं आरक्षण बेकायदेशीर असल्याचं त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्याचप्रमाणे ज्या जातींना चुकीच्या पद्धतीने ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलंय, त्या जातींना ओबीसी आरक्षणातून वगळा आणि त्या जागी मराठा समाजाला घ्या, असी मागणीही अॅड. राजेश टेकाळे यांनी केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.
नव्या याचिकेत नेमकी मागणी काय?
“इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी समाजाला देण्यात आलेलं आरक्षण बेकायदेशीर आहे. त्याचप्रमाणे ज्या जातींना चुकीच्या पद्धतीने ओबीसीमध्ये आरक्षण देण्यात आलंय, त्या जातींना ओबीसी आरक्षणातून वगळा आणि त्या जागी मराठा समाजाला घ्या.” – अॅड. राजेश टेकाळे, याचिकाकर्ते
प्रा. बाळासाहेब सराटेंकडूनही ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका
20 डिसेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती.
इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.
तसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.
संबंधित बातम्या :
ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? सुनावणीची तारीख ठरली!
… तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल : बाळासाहेब सराटे
मराठा आरक्षण : घुसखोरी नको, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही : सचिन माळी
मराठ्यांना 16 टक्के आरक्षण, महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती काय?