अँटिलिया स्फोटक प्रकरणात चौथ्या अधिकाऱ्यावर कारवाई, पोलिस निरीक्षक सुनील माने बडतर्फ
सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. (Police Inspector Sunil Mane Dismissed)
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाबाहेर सापडलेले स्फोटक प्रकरण (Mukesh Ambani Antilia Bomb Scare) आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) आणखी एका पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील माने (Police Inspector Sunil Mane) याला मुंबई पोलिसांनी पोलिस दलातून बडतर्फ केले आहे. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली आहे. (Antilia Bomb Scare Mansukh Hiren Murder Mumbai Crime Branch Police Inspector Sunil Mane Dismissed from Police service)
आतापर्यंत तीन पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई पोलीस दलातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये सचिन वाझे, रियाज काझी, विनायक शिंदे यांचा समावेश आहे. सुनील मानेला अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणी आधीच अटक करण्यात आली होती. मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्तांनी मानेला पोलीस दलातून बडतर्फ करण्याचे तात्काळ आदेश लागू केले.
कोण आहे सुनील माने?
सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता. नंतर त्याची सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथकाच्या काळाचौकी युनिटमध्ये दोन महिन्यांपूर्वी सुनील मानेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आला. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली.
अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. तर मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सुनील मानेने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्याचे अनेक पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत.
दिशाभूल करण्यासाठी फोन ऑफिसमध्ये
मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या दिवशी सुनील माने ठाण्यात होता. त्याने त्याचा फोन एका बॅगेमध्ये ठेवून ती बॅग सहकाऱ्यांच्या माध्यमातून कार्यालयाच्या परिसरातच ठेवली होती. जेणेकरून त्याचे लोकेशन तेच दिसावं. सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले.
संबंधित बातम्या:
विनायक शिंदे नाही, सुनिल मानेचा मनसुख हिरेन यांना हत्येच्या दिवशी फोन, NIA चा दावा
सचिन वाझेनंतर आता सुनील मानेचीही कार जप्त, बोरिवलीतून लाल गाडी NIA च्या ताब्यात
पोलीस निरीक्षक सुनील माने यांना अटक, मनसुख हिरेन हत्या प्रकरणी बेड्या
(Antilia Bomb Scare Mansukh Hiren Murder Mumbai Crime Branch Police Inspector Sunil Mane Dismissed from Police service)