जाहिरातीतून महिलांचं चारित्र्यहनन; शिवसनेनेच्या दणक्यानंतर ‘लक्ष्मणरेषा’ बनवणाऱ्या कंपनीचा माफीनामा

'लक्ष्मणरेषा' या झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत महिला वर्गाच्या अपमानाच्या विरोधात शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आवाज उठवला होता.

जाहिरातीतून महिलांचं चारित्र्यहनन; शिवसनेनेच्या दणक्यानंतर 'लक्ष्मणरेषा' बनवणाऱ्या कंपनीचा माफीनामा
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:41 PM

मुंबई : झुरळ पाहिल्यावर एक महिला तिथे सुतारकाम करत मजुराच्या अंगावर उडी मारते व तो तिला अलगद झेलतो, त्याचवेळी तिचा नवरा हे सगळं पाहत असतो, अशी जाहिरात करून समस्त महिलांचा जाहीर अपमान करत असलेल्या कंपनीचे डोके शिवसेनेच्या दणक्याने ताळ्यावर आले आहे. ‘लक्ष्मणरेषा’ या झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत महिला वर्गाच्या अपमानाच्या विरोधात शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी आवाज उठवला होता. तसेच याची थेट तक्रार ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काऊन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र महिला आयोग यांच्याकडे केली होती. तसेच या जाहिरातीचे प्रक्षेपण त्वरित थांबविण्याची मागणी केली होती. शिवसेनेच्या दणक्यामुळे या कंपनीने महिला वर्गाची माफी मागितली असून ती जाहिरात यापुढे प्रक्षेपित केली जाणार नाही, असे आश्वासन डॉ. मनीषा कायंदे याना दिले आहे. (Apology from company that made ‘laxman rekha’ after clash with Shiv Sena)

आज 21 व्या शतकात स्त्री पुरुष समान नाहीत हेच या जाहिरातीत अधोरेखीत केले होते. सायना नेहवाल, मेरी कोम, मीराबाई चानू सारख्या भारतीय महिला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकून भारताचे नाव जगात मोठं करत आहे. दुसरीकडे जाहिरातीद्वारे महिलांना कमकुवत दाखवून आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी बाब यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा डॉ. मनीषा कायंदे यांनी या कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला आहे.

ही तर हीन प्रवृत्ती

लक्ष्मणरेखा या झुरळांना मारणाऱ्या कीटकनाशक कंपनीने अलीकडेच एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत एक महिला झुरळाला खूपच घाबरते. झुरळाला पाहून नवऱ्यासमोरच तिच्या घरात काम करत असलेल्या सुताराच्या अंगावर उडी मारते, असे या जाहिरातीत दाखवण्यात आले होते. या जाहिरातीचे थेट प्रक्षेपण त्वरित थांबवण्यात यावे. अन्यथा हे उत्पादन बनवणाऱ्या कंपनीविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. कायंदे यांनी दिला होता. अशा जाहिरातीची निर्मिती करणे हे कंपनीच्या हीन प्रवृत्तीचे द्योतक आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला होता.

इतर बातम्या

कोव्हिडनंतर रोजीरोटीचा फार मोठा प्रश्न, त्याला तोंड देऊ शकलो नाही तर मोठे संकट निर्माण होईल: मुख्यमंत्री

(Apology from company that made ‘laxman rekha’ after clash with Shiv Sena)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.