मुंबईतील ॲपल स्टोअरचे महिन्याचे भाडे किती? तुम्ही म्हणाल, यामध्ये माझे आयुष्यभराचे घर होईल
apple store : मुंबईत ॲपल स्टोअर सुरु झाले आहे. या स्टोअरची चर्चा चांगली झाली. कारण त्याच्या उदघाटनासाठी टीम कूक आले होते. बीकेसीमध्ये सुरु झालेले हे स्टोअर भाड्याने घेतले आहे. त्याचे महिन्याचे भाडे ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. दिल्लीतील भाडे तसेच आहे.
मुंबई : भारतात ॲपल स्टोअरची (apple store) सुरूवात झाली आहे. कंपनीला 25 वर्ष पूर्ण झाल्याचा पार्श्वभूमीवर ॲपलचे सीईओ टीम कुक (tim cook) यांच्या उपस्थितीत मुंबईत ॲपल स्टोअरचे उद्घाटन झाले. मुंबईनंतर आता राजधानी दिल्लीत ॲपल स्टोअर सुरु झाले. मुंबईत ज्या मॉलमध्ये हे स्टोअर उघडले आहे ते रिलायन्सच्या मालकीचे आहे. यामुळे या स्टोअरचे भाडे थेट रिलायन्सच्या मालकाला म्हणजेच मुकेश अंबानी कुटुंबाला द्यावे लागणार आहे. मुंबई, दिल्लीतील भाडे ऐकून सामान्यांना धक्का बसणार आहे.
मुंबईत कुठे सुरु झाले
सुसज्ज, आलिशान आणि स्टायलिश, ॲपल कंपनीचे रिटेल स्टोअर मुंबईतील बीकेसीत सुरु झाले. बीकेसीतील ॲपलचे स्टोअर सुरु झाले. या ठिकाणी असलेल्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये ॲपल स्टोअर सुरु करण्यात आले. विशेष म्हणजे, हे पहिले रिटेल ॲपल स्टोअर आहे. जे केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात उघडले आहे. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भारतातील पहिल्या ऍपल स्टोअरचे उद्घाटन केले.
किती आहे भाडे
अंबानी कुटुंबाच्या रिलायन्स जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उघडलेल्या नवीन ॲपल स्टोअरसाठी ॲपल कंपनीला दरमहा मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. ॲपल दरमहा ॲपल स्टोअरचे भाडे म्हणून अंबानी कुटुंबाला सुमारे 42 लाख रुपये देईल. ॲपलने या स्टोअरसाठी सुमारे 20,800 स्क्वेअर फूट जागेसाठी अंबानीसोबत 11 वर्षांचा करार केला आहे. एका स्टोअर क्षेत्रासाठी किमान मासिक भाडे सुमारे 42 लाख रुपये आहे.
तीन वर्षांनी वाढ
स्टोअरचे भाडे दर तीन वर्षांनी भाडे 15% वाढेल. याशिवाय, Apple ला पहिल्या तीन वर्षांसाठी 2% आणि पहिल्या तीन वर्षानंतर 2.5% महसूल भरावा लागेल. ऍपलचा मुंबईतील अंबानींच्या मालकीच्या मॉलशी 11 वर्षांचा करार हा त्याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधात एक मोठे पाऊल आहे. कंपनीने दिल्लीत उघडलेल्या स्टोअरचे भाडेही 40 लाख आहेत. यामुळे तुम्ही म्हणाल, या महिन्याभराच्या भाड्यात माझा एक फ्लॅट होईल.
कूक अंबानींच्या घरी
ॲपल स्टोअर सुरू होण्याच्या एक दिवस आधी सोमवारी टीम कूक मुकेश अंबानींच्या घरी पोहोचला. अँटिलियाचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी ॲपलच्या सीईओसोबत दिसत आहेत.
ॲपल स्टोअरमध्ये मिळतील या सेवा-सुविधा
या स्टोअरमध्ये तुम्ही ॲपलच्या अनेक विशेष सेवांचा लाभ घेऊ शकता. ॲपल स्टोअरमध्ये ट्रेड इन प्रोग्राम देखील उपलब्ध असेल. त्याच वेळी, जीनियस बार ही एक वेगळी गोष्ट आहे. मुंबईप्रमाणेच दिल्लीतील ग्राहकांसाठी लेटेस्ट आयफोन, मॅक, आयपॅड, एअरपॉड, ॲपल वॉच आणि ॲपल टीव्ही सारखी उत्पादने प्रदर्शित केली जातील.