मराठा मोर्चाचं वादग्रस्त व्यंगचित्र : उद्धव ठाकरे, राऊतांविरोधात अटक वॉरंट

पुसद (यवतमाळ) : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून, मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे. समन्स बजावूनही आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. “सदर प्रकरणातील आरोपी समन्स […]

मराठा मोर्चाचं वादग्रस्त व्यंगचित्र : उद्धव ठाकरे, राऊतांविरोधात अटक वॉरंट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

पुसद (यवतमाळ) : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवून, मराठा समाजाचा अपमान केल्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संपादक संजय राऊत, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई आणि राजेंद्र भागवत या चौघांविरुद्ध पुसदच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला आहे. समन्स बजावूनही आरोपी न्यायालयात हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

“सदर प्रकरणातील आरोपी समन्स बजावूनही न्यायालयात तारखेला हजर राहिले नाहीत. हे प्रकरण लांबवण्याच्या हेतून जाणून-बुजून गैरहजर राहत आहेत. त्यामुळे आरोपींविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात यावा.” असे पुसद न्यायालयाने सुनावणी दरम्यान म्हटले होते.

मराठा आरक्षणासाठी राज्यभरात मराठा समाजाने मूक मोर्चे काढले होते. एकामागोमाग एक राज्यभर अत्यंत शांततेत, अहिंसात्मक पद्धतीने मराठा समाजाने मोर्चे काढले होते. अनेक संघटनांनी, समाजांनी, राजकीय पक्षांनी मराठा समाजाच्या मूक मोर्चांचं कौतुक केलं होतं. प्रसंगी पाठिंबाही दिला होता. मात्र, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा समाजाच्या या मूक मोर्चांची खिल्ली उडवण्यात आली होती.

मराठा समाजाच्या मूक मोर्चादरम्यान ‘सामना’त प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्यंगचित्रातून, या मोर्चांना ‘मूका मोर्चा’ म्हणण्यात आलं होतं. या व्यंगचित्रानंतर शिवेसना आणि त्यांचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’विरोधात मराठा समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. शिवसेनेकडून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र, संतप्त आणि नाराज मराठा समाजातील व्यक्तींनी ठिकठिकाणी ‘सामना’विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.